Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

९७ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला रंगणार बाल मेळावा; जाणून घ्या नियमावली!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 November 2023, 15:08

Pune Prime News : साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे संपन्न होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी २०२४ रोजी बाल मेळावा होणार आहे. बाल मेळावा आयोजनासंदर्भात बैठक नुकतीच पार पडली. हा बाल मेळावा संपूर्ण विद्यार्थी केंद्रित असेल तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य ठरेल, असे मत बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले.

या बाल मेळावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी होते. बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळमेळावा समिती प्रमुख संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. भैय्यासाहेब मगर यांनी सूत्रसंचालन केले. वसुंधरा लांडगे व स्नेहा एकतारे यांनी आयोजनातील प्रमुख मुद्दे मांडले. त्यानंतर बैठकीत बालमेळावा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

या बैठकीस म. वा. मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, बजरंग अग्रवाल, दिनेश नाईक, सतीष देशमुख, मुकेश पाटील, रमेश सोनवणे, डॉ. कुणाल पाटील, के. पी. बागुल, राहुल ब्रह्मे, वैभव आढाव, तृप्ती खैरनार, विद्या पाटील, मनोहर नेरकर, जी. एस. चौधरी आदींची उपस्थिती होती.

 

अशी आहे बाल मेळाव्यासाठी नियमावली

बाल मेळाव्याचे उद्घाटक एक मुलगा व एक मुलगी यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्यांचे साहित्य क्षेत्रात कविता, कथा किंवा इतर साहित्य प्रकाशित झाले असेल, त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला कोणी नामवंतांनी गौरविले असेल अथवा एखादा साहित्यिक पुरस्कार मिळालेला असेल, अशा इयत्ता दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना नाटिका वा नाट्य प्रवेश सादर करायचे असतील, त्यांनी मंडळ सांगेल त्यावेळेस तेथे उपस्थित राहून आपले प्रवेश सादर करावेत. त्यातून निवड चाचणी होऊन बाल मेळाव्यात सादरीकरणासाठी संधी मिळेल.

बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे ठराविक तारखेपर्यंत पाठवावीत, त्यांची कार्यशाळा घेतली जाईल व त्या कार्यशाळेतून निवड करून बालमेळाव्याच्या मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या बालकांवर टाकण्यात येतील. बाल मेळाव्यातील विविध सत्रांचे अध्यक्ष देखील आलेल्या साहित्यिक प्रस्तावातूनच निवडण्यात येतील. त्यासाठी मंडळाकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे.

बाल मेळाव्यातील उद्घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतांसाठी गायनाची निवड चाचणी मंडळ सांगेल त्या दिवशी व त्याच ठिकाणी घेण्यात येईल. त्यातूनच निवडक मुलांना बाल मिळाव्यात समूहगीतातील ‘खरा तो एकची धर्म’ व ‘बलसागर भारत होवो’ या गाण्यांवर समूहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल. इतर अधिकार बाल मेळावा आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी बाल मेळावा समिती प्रमुख तसेच मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12
Next Post
Woman committed suicide in baramati pune

धक्कादायक! तुमकूर येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या; 'या' कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.