कोल्हापूर : राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. कोणी पैशांसाठी कोणाचा खून करत आहे. तर कोणी जुन्या वादातून हत्या करत आहे. पण कोल्हापूरमधून एक अशी बातमी समोर येत आहे. ज्यामुळे संपूर्ण कोल्हापूर हादरलं आहे. सुट्टीसाठी मित्राचा खूप केला असल्याची घटना समोर येत आहे.

कोल्हापूरमधील हातकणंगले येथील ही घटना आहे. सुट्टी मिळावी यासाठी मित्रानेच आपल्या सहकाऱ्याचा विजेचा शोक देऊन खून केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या धार्मिक शिक्षण देणारी संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी या कारणासाठी बिहार इथल्या अकरा वर्षीय फैजान नजिम याने आपल्या मित्राच्या तोंडात कापसाचा बोळा दाबून विजेचा शॉक दिला. यात त्याच्या अल्पवयीन मित्राचा मुलाचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.
आळते येथील धार्मिक शिक्षणसंस्थेत (मदरसा) घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण कोल्हापूर हादरलं आहे. 16 जून च्या पहाटे पाच वाजता अल्पवयीन विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या संस्थेत एकूण ६० मुले राहतात. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरु केला. व संशयित मुलाला ताब्यात घेतले. आरोपीने आपला गुन्हा आता कबूल केला असून, या घटनेत आणखी काही मुलांचा समावेश होता का? याचा शोध पोलीस घेत आहेत.







