Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांनी कायमच ओबीसींच्या विरोधात…; ‘या’ ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 22 June 2024, 14:52

Maratha OBC Reservation : राज्यात सद्या मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण देतानाच ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, यांची काळजी सरकारने घ्यावी अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही होताना दिसून येत आहे. आता अशातच शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

 

ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये, यासाठी ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून, यासाठी ओबीसी बांधव उपोषण करत आहेत. सरकारचं शिष्टमंडळही भेट घेणार आहे. अशातच आता एका ओबीसी नेत्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी मराठा समाजाच्या बाजूने आणि ओबीसी समाजाच्या विरोधात राजकारण केल्याचा आरोप भाजपचे ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.

शरद पवारांवर गंभीर आरोप

शरद पवार यांनी नेहमीच मराठा राजकारण करत असताना, ओबीसी विरोधातील राजकारण केलं आहे. शरद पवार हे कायम ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत. शरद पवार आणि राष्ट्रवादीची काय भूमिका राहिली हे स्पष्ट आहे. शरद पवारांनी ओबीसींसाठी काही केलं नाही. उलट कायम त्यांनी ओबीसी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांना पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं? हे सर्वाना माहिती आहे. शरद पवार, राजेश टोपे जाऊन मनोज जरांगेंना जाऊन भेटतात. आता ओबीसीचं आंदोलन सुरू झालं आहे. तर शरद पवारांसोबतच इतर कुणीही त्यांना भेटायला आलं नाही. मनोज जरांगे यांच्यामागे शरद पवार आहेत, असं विधान परिणय फुके यांनी केलंय. जालन्यात ओबीसी बांधव उपोषण करत आहेत.

या उपोषण स्थळी ओबीसी बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी बांधव वडीगोद्रीत दाखल झालेत. विविध संघटनाचे पदाधिकारी देखीव उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी देखील शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

परिणय फुके यांची भूमिका काय?

आमची भूमिका नेहमी एकच आहे की मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, असंही परिणय फुके यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा काही दुसरा हेतू आहे. राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले. यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले आणि ओबीसीतून मिळाले. तर राज्यात तेढ निर्माण होईल, हेच मनोज जरांगे यांना पाहिजे आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Kadamwakvasti Grampanchyat clerk dilip kalbhor passed away

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे लिपिक दिलीप काळभोर यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.