Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! उपोषण सोडलं, सरकारला 90 दिवसांची मुदत; पहाटेच्या घडामोडीने चर्चेला उधाण

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 17 September 2026, 8:17

बीड: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला. याच पार्श्वभूमीवर सरकारचे काही मंत्री आणि लोकप्रतिनिधी पाटोदा येथे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले.

पाटोदा येथील एका मठात जरांगे पाटील मुक्कामी असून तेथेच सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. या बैठकीत मराठा आरक्षणासह गॅझेटच्या अंमलबजावणीशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे तसेच आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस चर्चेसाठी पोहोचले होते.

या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या. विशेषतः सातारा आणि कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने याबाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यास आपल्या पुढील भूमिकेचा विचार करू, असे संकेत त्यांनी दिले.

दरम्यान, सातारा गॅझेटच्या प्रश्नावर सरकारला 90 दिवसांची मुदत देण्यात आल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. या कालावधीत राज्यातील विविध भागांत जाऊन मराठा समाजामध्ये जनजागृती करण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आंदोलनाची दिशा आता केवळ उपोषणापुरती मर्यादित राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

 

हैदराबाद गॅझेटशी संबंधित नोंदींचाही मुद्दा चर्चेत आला. या प्रक्रियेत सुमारे 58 लाख नोंदी असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. या नोंदींच्या बाबतीत कोणतीही कपात होऊ नये आणि संबंधित प्रक्रिया काळजीपूर्वक पार पडावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेणार असल्याचे सकारात्मक संकेत दिले असले, तरी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकार पुढील 90 दिवसांत कोणती पावले उचलते, गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत काय निर्णय घेतले जातात आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गराडे येथे कोयता बाळगून फिरणारे तिघे पोलिसांच्या रडारवर; नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 13:01

जेजुरीजवळील पांडेश्वरमध्ये सर्पदंशाने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; घराशेजारी खेळताना काळाचा घाला

Saturday, 24 October 2026, 12:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात नवीन ट्विस्ट! त्यानेच हल्ला घडवून आणल्याची आरोपीने विशेष शाखेला कथित कबुली दिल्याची पोलीस दलात चर्चा; आर्थिक उलाढालीची राज्यभर चर्चा

Saturday, 24 October 2026, 12:39

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36
Next Post

पुण्यात गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय! 8 दिवस ‘हे’ प्रमुख रस्ते बंद, वाहनचालकांनी लक्ष द्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp