Beed Yogesh Kshirsagar : बीडमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येत असताना स्थानिक राजकारणात मोठे बदल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला येथे मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी (अ प) गटाचे नेते योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

कमळ चिन्हावर बीड नगरपालिकेची निवडणूक लढवणार (Yogesh Kshirsagar)
योगेश क्षीरसागर आता भाजपच्या कमळ चिन्हावरून बीड नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत. “राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत अडचणी होत्या. पक्ष सोडल्यानंतर आता मोकळा श्वास घेत असल्याची भावना आहे,” असे योगेश क्षीरसागर म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवार गटाला मोठे राजकीय नुकसान झाल्याचे मानले जाते.
हेही वाचा: बिहारच्या विजयाचे नायक निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार; ‘आप’ ची पोस्ट व्हायरल, पहा Video…
डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची निर्विवाद सत्ता
नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सोमवारचा असल्याने क्षीरसागर यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या कुटुंबाचा बीड नगरपालिकेवर दीर्घकाळ प्रभाव राहिलेला आहे. त्यांचे वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी अनेक वर्षे येथे निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली होती.
योगेश क्षीरसागर म्हणाले… (Yogesh Kshirsagar)
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर योगेश क्षीरसागर म्हणाले, “पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम्ही आधीपासूनच तयारी करत होतो. बीड नगरपरिषदेची जागा महिलांसाठी राखीव आहे. त्यानुसार आम्ही कमळ चिन्हावरून निवडणूक लढणार असून आम्ही व भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे काम करणार आहोत. असे ते म्हणाले.”
पदाधिकारी नियुक्तीत माझा विचार नाही; Yogesh Kshirsagar
या वेळी त्यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजीही उघडपणे व्यक्त केली. “मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले, तरीही मला विनाकारण विरोध सहन करावा लागला. पदाधिकारी नियुक्तीत माझा विचार करण्यात आला नाही. याबाबत वरिष्ठांशीही चर्चा केली होती,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बीड नगरपरिषदेची जबाबदारी अजित पवारांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे दिल्याने आपली नाराजी झाल्याचेही त्यांनी सांगितले. “बाहेरील लोकांनी बीडमध्ये येऊन प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाय, पण बीडकरांनी प्रत्येक वेळा असे प्रयोग फोल ठरवले आहेत. हा प्रयोगही बीडकर नक्कीच हाणून पाडतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: विमाननगरमधील वाहतूक कोंडीसाठी नवा ‘मास्टर प्लॅन’! या’ दोन प्रमुख मार्गांवर होणार ‘वन-वे’ लागू…







