Wednesday, March 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed : जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला जनतेनेच घरचा रस्ता दाखवला; ६७४ जणांनी ‘एकमुखाने’ नोंदवला विरोध, नक्की काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 21:34
beed

photo- social media

Beed : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील लोणवळ गावच्या सरपंच मुक्ताबाई राठोड यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत 674 मतांनी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे राठोड यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंचाला ग्रामस्थांनीच पदावरून दूर केल्याने तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

अविश्वास ठरावासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. सभेत मोठ्या संख्येने मतदार उपस्थित राहिले. मतदान प्रक्रियेत 674 मतदारांनी ठरावाच्या बाजूने कौल दिला. आवश्यक बहुमत मिळाल्याने ठराव मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली.

गावातील विकासकामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आणि ग्रामस्थांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करत हा ठराव आणण्यात आला होता. काही ग्रामस्थांनी निधी वापर, कामांची निवड आणि निर्णयप्रक्रिया याबाबत नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांपासून गावात यावरून वातावरण तापलेले होते.

दरम्यान, ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असेल, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. नियमानुसार आता नव्या सरपंचाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रशासनाकडून त्याबाबत लवकरच पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोणवळमधील घडामोडी इतर ग्रामपंचायतींसाठीही धडा ठरतील, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Ear Health Tips: कानात जास्त मळ साचतोय? ‘या’ 3 गोष्टी टाळा आणि कानाचं आरोग्य जपा

Tuesday, 3 March 2026, 22:48

Women’s Wrestling: सोलापूरच्या लाल मातीत रंगणार महिला कुस्तीचा थरार! ‘महाराष्ट्र केसरी’साठी 400 महिला स्पर्धकांमध्ये चुरस

Tuesday, 3 March 2026, 22:40

Iran-US Conflict: सर्वस्व गमावल्यानंतर इराणची चर्चेची तयारी, पण ट्रम्प म्हणाले, आता उशीर झालाय!

Tuesday, 3 March 2026, 21:48

सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीची योग्य वेळ आली? जाणून घ्या अधिक माहिती

Tuesday, 3 March 2026, 21:28

Pune News: पुण्यात व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण; पुढं नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 3 March 2026, 20:08

Rajya Sabha Election: भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी प्रसिद्ध; जाणून घ्या अधिक माहिती

Tuesday, 3 March 2026, 18:59
Next Post
Crime

Crime : अजिंक्यताऱ्याच्या 200 फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा करुण अंत.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.