मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra ZP Election Date Schedule 2026) निवडणुकांना वेग आला असून आता थेट जिल्हा परिषद निवडणुकांचे (Local Body Election) चित्र स्पष्ट होत चालले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या (ZP Election) निवडणुका पार पडल्या आहेत. सध्या दुसऱ्या टप्प्यात 29 महापालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर (ZP Election Date) तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी जानेवारी 2026 हा महत्त्वाचा कालावधी ठरणार आहे. (Latest Marathi News)

निवडणूक दोन टप्प्यांत होण्याची शक्यता
राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याची शक्यता आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आणि 336 पैकी 211 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.
पहिला टप्पा
या पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा पूर्ण झाल्याने निवडणूक घेण्यास आयोगाने तयारी दर्शवली आहे.
वेळापत्रक
6 ते 8 जानेवारीदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, 10 ते 17 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 18 ते 20 जानेवारीदरम्यान अर्जांची छाननी व माघार प्रक्रिया पार पडेल. 21 जानेवारीला चिन्ह वाटप होणार असून 30 जानेवारी रोजी मतदान आणि 31 जानेवारीला मतमोजणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरक्षणाचा मुद्दा
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने दिली असली तरी, आरक्षणाच्या अडचणीमुळे उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्यानंतरच होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य वेळापत्रक समोर आल्याने पुणेसह संबंधित जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे.







