Sunday, March 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : कोकणात राणेच ‘किंगमेकर’! नितेश राणेंची रणनीती यशस्वी; ५ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती जागांवर भाजप-शिवसेनेचा बिनविरोध विजय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 25 January 2026, 13:06
Politics

photo- social media

Politics : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने सुरुवातीलाच आघाडी घेत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. भाजप नेते व पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या राजकीय प्रभावाखाली जिल्ह्यात तब्बल ११ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात ५ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती जागांचा समावेश असून, सिंधुदुर्गच्या राजकारणात राणे कुटुंबाची पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू होताच अनेक ठिकाणी विरोधकांनी माघार घेतल्याने भाजप-शिवसेना महायुतीला थेट यश मिळाले. जिल्हा परिषदेत खारेपाटणमधून प्राची इस्वालकर, बांद्यातून प्रमोद कामत, जानवलीतून रुहिता राजेश तांबे, पडेलमधून सुयोगी रवींद्र घाडी आणि बापर्डेतून अवनी अमोल तेली हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यातील बहुतांश जागा भाजपने राखल्या असून, एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे.

पंचायत समित्यांमध्येही महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांतील विविध गणांमधून भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामध्ये कणकवली (वरवडे) येथून सोनू सावंत, देवगड तालुक्यातील पडेल, नाडण आणि बापर्डे येथून अनुक्रमे अंकुश ठूकरूल, गणेश राणे आणि संजना लाड, तसेच वैभववाडी (कोकीसरे) येथून साधना नकाशे यांचा समावेश आहे. (Politics)

या घडामोडींमुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षांची संघटनात्मक कमजोरी पुन्हा उघड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्येही राणे कुटुंबाचे वर्चस्व दिसून आले होते. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही त्याच प्रवाहाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी असल्याने येत्या काही दिवसांत आणखी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या बिनविरोध विजयांमुळे महायुतीला मानसिक आणि राजकीय आघाडी मिळाली असून, सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Land Scam: 'Earthquake' in Pune's Revenue Department! 'Game over' for 152 senior officials; Reshuffle in seven posts and direct inquiry, suspension action

Pune Land Scam: पुण्याच्या महसूल विभागात ‘भूकंप’! 152 बड्या अधिकाऱ्यांचा ‘गेम ओव्हर’; सातबाऱ्यांमध्ये फेरफार अन् थेट चौकशी, निलंबनाची कारवाई

Sunday, 22 March 2026, 14:50

कोण आहेत ते 9 मंत्री? अशोक खरातच्या दरबारात नक्की काय चालायचं? संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Sunday, 22 March 2026, 14:41
Rupali Thombre: 'Ajitdada knew about this Bhondubaba case, he asked for Chakankar's resignation..." Rupali Thombre's statement; said "He is Chakankar's sugar daddy....

Rupali Thombre: ‘हे भोंदूबाबा प्रकरण अजितदादांना माहिती होतं, त्यांनी चाकणकरांचा राजीनामा…” रुपाली ठोंबरेंचं वक्तव्य; म्हणाल्या “तो चाकणकरांचा शुगर डॅडी….

Sunday, 22 March 2026, 14:24

नारेगावात गर्भलिंगनिदान रॅकेट उघड; दोन जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

Sunday, 22 March 2026, 14:23

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात ‘पुणे कनेक्शन’ उघड! 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या संशयिताचे नाव आले समोर; एसआयटी कडून मोठी कारवाई?

Sunday, 22 March 2026, 13:48
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा खरात प्रकरणाचं ‘SRA’ कनेक्शन! SRA अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत खरातची आर्थिक भागीदारी; तपासात मोठे मासे गळाला?

Sunday, 22 March 2026, 13:32
Next Post

Accident News: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! बाईकस्वाराला वाचवताना ट्रक उलटला, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.