Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्याच्या’साठी पोटच्या २ लेकरांचा घेतला जीव; हृदय पिळवटून टाकणारी घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 9 April 2024, 20:35

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम या गावातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबधांला अडथला येणाऱ्या पोटच्या मुलींची आईनेच गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने सदर महिलेला अटक केली आहे. शितल पोले असं अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ३१ मार्च रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आराध्या पोळे (वय-५) आणि सार्थक पोळे (वय-३) या दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. दोन्ही मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा पोलीसांनी मृत घोषित केले होते. दोन्ही मुलांच्या संशयास्पद मृत्यू नंतर पोलीसांनी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे रुग्णालयात पाठवले होते.

या प्रकरणाची मांडवा पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. दरम्यान, पोलिसांना दोन्ही मुलांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो घातपात असावा असा संशय होता. त्यानुसार पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांनी इतर कर्मचाऱ्यांसह चौकशीला सुरवात केली.

या चौकशी दरम्यान दोन्ही मुलांचे वडील सदानंद पोळे घटनेच्या दिवशी दुपारी आठवडी बाजाराला गेले होते. ते घरी आल्यानंतर मुलांची आई शितल पोळे ही घरासमोर भांडी साफ करत होती. त्यांनी मुलांबाबत विचारलं असता मुले झोपली असल्याचे तिने सांगितले. वडीलांनी मुलांना उठवण्याचा प्रय़त्न केला, मात्र ती उठली नाहीत अशी माहिती वडीलांनी पोलीसांना दिली.

 

पोलीसी हिसका दाखवताच आईने दिली कबूली

घटना घडली त्या दिवशी मुले घराबाहेर गेली नव्हती. बाहेरूनही कोणी घरी आले नव्हते. त्यामुळे पोलीसांचा संशय अधिकच बळवला. घटनेच्या वेळी मुलांची आई एकटीच घरी होती. त्यामुळे पोलीसांनी तिची कसून चौकशी केली. सुरूवातीला तीने कुठलीच माहिती नसल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी पोलीसी हिसका दाखवताच, आईने कबूली दिली.

मुलांच नाक, तोंड दाबून केला खून

शितल पोळे हीचे लग्नापुर्वी एका तरुणाशी प्रेमसंबध होते. तो लग्नानंतरही शितलला भेटत होता. यावरून दोघामध्ये भांडणे होत होती. शितला आपल्या प्रियकरा सोबत पळून जायचे होते. त्यासाठी तीने प्रियकराला लग्नही करू दिले नव्हते. पण पळून जाण्यात आराध्या आणि सार्थक ही मुले अडसर ठरत होती. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांचा नाक आणि तोंड दाबून खून केला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“अमेरिकेतल्या मुलाने पार्सल पाठवलंय!” सायबर चोरट्यांचा डाव यशस्वी; पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला 3.23 लाखांचा फटका

Monday, 19 October 2026, 14:26

वीर येथे शेतमालक व कुटुंबाला शेतात घुसून मारहाण; 20 ते 25 बाऊन्सर आणि महिलांविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 14:13

सोरतापवाडीतील लॉजवर खुलेआम देहविक्री व्यवसाय सुरू? उरुळी कांचन पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

Monday, 19 October 2026, 13:59

दोन महिन्यांत 67 वाहने शोधून मूळ मालकांना केली परत; शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Monday, 19 October 2026, 13:53

वीजचोरीचा प्रकार उघड! महावितरणचे नुकसान; आलेगाव पागा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 13:43

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; मुंबईतील रॅपिडो चालकासह 3 जण ताब्यात

Monday, 19 October 2026, 13:38
Next Post
Deputy CM Ajit Pawar-Led NCP Faction Moves Bombay High Court Against Speaker's Refusal To Disqualify Sharad Pawar-Led NCP's MLAs

'पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर...'; अजित पवारांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp