Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पैलवान सिकंदर शेख याने जम्मूचा आंतरराष्ट्रीय पैलवान अमीन बनिया याला दाखविले आस्मान ; सिकंदर ठरला ‘शहाजी केसरी’ चा मानकरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 26 February 2023, 11:59

दीपक खिलारे

इंदापूर : कुस्तीचा बादशाह पै. सिकंदर शेख याने जम्मूचा आंतरराष्ट्रीय पै. अमीन बनिया याचेवर एक चाक डावाने विजय मिळवित शहाजी केसरी किताब पटकाविला आहे.

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती लोकनेते कै.शहाजीराव पाटील यांच्या ४४ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे शनिवारी (ता.२५) आयोजन करण्यात आले होते.

 

या अंतिम लढतीतील विजेता पै. सिकंदर शेख याला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली.

अंतिम लढतीत कुस्तीचा बादशाह पै. सिकंदर शेख याने जम्मूचा आंतरराष्ट्रीय पै.अमीन बनिया यांच्या तुल्यबळ खेळाने उपस्थितीतांमध्ये क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत होती. अंतिम लढत ही अतिशय रोमांचकारी, डोळ्याचे पारणे फेडणारी झाली. या लढतीमध्ये कुस्तीचा बादशाह पै. सिकंदर शेख याने एक चाक डावाने विजय मिळवला व उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

तर दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र चॅम्पियन पै. माऊली (हर्षद) कोकाटे याने महाराष्ट्र केसरी पै.हर्षद सदगीरला दुहेरी पट काढून चितपट केले व प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

दरम्यान, या मैदानामध्ये प्रेक्षणीय झालेल्या लढतीमध्ये पै. महारुद्र काळेल याने पै. शुभम सिदनाळे वर विजय मिळविला. तर पै. दादा मुलाणी विरुद्ध पै. वैभव माने, पै. मामा तरंगे व पै.मनीष रायते या दोन लढती बरोबरीत सोडविण्यात आल्या. तर रोमांचकारी लढतीत पै.कालिचरण सोलनकर याने पै. आशिष वावरे वर आणि पै.नामदेव कोकाटे याने अमित सूळ वर विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, मल्ल सम्राट पै. रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, अस्लम काझी, पै. मंगलदास बांदल, कुस्ती कोच गणेश दांगट व विश्वास हरगुले, उत्तम फडतरे, प्रदीप जगदाळे, मयुसिंह पाटील, करणसिंह घोलप, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रीतम पाटील आदीसह राज्यभरातून आलेले मल्ल तसेच इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कुस्ती शौकीन उपस्थित होते.

शहाजी कुस्ती आखाडा यशस्वीरित्या पार पाडणेसाठी संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड.कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, कमाल जमादार, दत्तात्रय पोळ, कार्यकारी संचालक राम पाटील यांनी परिश्रम घेतले. तर कुस्ती आखाड्याचे नियोजन पै.कमाल जमादार, पै.पिंटू काळे, विलासराव वाघमोडे, पै.नितीन माने, पै.अमर जगदाळे, पै.राजेंद्र चोरमले आदींनी केले.

कुस्तीचे निवेदन युवराज केचे, प्रशांत भागवत यांनी केले. तर सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर व अमर निलाखे यांनी केले.

अंतिम लढतीतील उत्कंठता…

 

पै. सिकंदर शेख व जम्मूचा पै.अमीन बनिया यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. कुस्ती लावण्यात आली.दोन्ही पैलवान अतिशय तुल्यबळ होते. प्रारंभी पै.अमीन बनिया यांने एकेरी पट काढून पै. सिकंदर शेख याचेवर कब्जा घेतला. मात्र त्यातून पै.सिकंदर शेखने सुटका करून घेतली. त्यानंतर पै. सिकंदर शेख ने बगल डूब डाव करून पै.अमीन बनिया वर ताबा मिळविला. मात्र त्यातून पै.अमीन बनीयाने सुटका करून घेतली. दोन्ही पैलवान ताकदवान व चपळ असल्याने कुस्ती कोण जिंकणार याची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत होती. प्रेक्षक श्वास रुखून धरून कुस्ती पाहत होते, त्याचवेळी पै. सिकंदर शेखने पुन्हा पै.अमीन बनीयावर पकड मिळवीत एक चाक डावाने चितपट केले व कुस्ती शौकीनांची वाहवा मिळविली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17
Next Post

वृद्धाश्रमातील मैत्रीतून प्रेम फुलत गेले, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रपोज आणि अखेर ते जीवनसाथी बनले..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.