Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

RCB संघाच्या बक्षिसाची रक्कम किती? मिळाले ‘इतके’ कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 June 2025, 13:58

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर 18 वर्षांचा दुष्काळ संपवत आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करत आयपीएलचा मुकुट प्रथमच आपल्या शिरपेचात खोवला. या विजयासह विराट कोहलीचं 18 वर्षांचं स्वप्न साकार झालं.

सामना कसा झाला?

नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCB कडून विराट कोहलीने संयमी पण दमदार 43 धावांची खेळी केली. त्याला साथ दिली जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनी. बंगळुरूने 20 षटकांत 190 धावांचं लक्ष्य उभारलं.पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि काईल जेमिसन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत संघाला सामन्यात टिकवून ठेवलं. पण उत्तरादाखल खेळताना पंजाब किंग्सला RCB च्या भेदक आणि कडक गोलंदाजीसमोर फडफडावे लागले. सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या आणि जोश हेझलवूड यांनी शानदार कामगिरी करत पंजाबचा डाव 184 धावांवर रोखला. या विजयासह RCB चं पहिलं IPL विजेतेपद अखेर त्यांच्या पदरी आलं.

 

विजेत्या RCB ला मिळाले ‘इतके’ कोटी रुपये!

IPL 2025 चं विजेतेपद मिळाल्यानंतर RCB संघाला BCCI कडून प्राईझ मनी म्हणून तब्बल ₹20 कोटी रुपये मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पंजाब किंग्सला ₹12.5 कोटी मिळाले.वैयक्तिक कामगिरीसाठीही अनेक खेळाडूंना मोठ्या प्रमाणात गौरवण्यात आलं. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 15 सामन्यांत 759 धावा करत ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरला, तर त्याच संघातील प्रसिद्ध कृष्णा याने सर्वाधिक 25 बळी घेत ‘पर्पल कॅप’ मिळवली. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने 717 धावांसह ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ पुरस्कार पटकावला. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने केवळ 7 इनिंग्समध्ये 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा करत ‘सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन’चा किताब मिळवला. शेवटी, सर्वाधिक शिस्तबद्ध खेळासाठी ‘फेअर प्ले अवॉर्ड’ चेन्नई सुपर किंग्स संघाला देण्यात आला.

विराट कोहलीची प्रतिक्रिया

अहमदाबादमध्ये सामना संपल्यावर समालोचक मॅथ्यू हेडनला पहिली प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला, “शेवटचा बॉल टाकला गेला, तेव्हा माझा ऊर भरून आला. भावनांचा बांध फुटला.”हा विजय संघासाठीच नाही, तर चाहत्यांसाठीही महत्त्वाचा असल्याचंही विराटनं सांगितलं.”मी या टीमसाठी माझी उमेदीची वर्षं दिली, माझ्या कारकिर्दीची 18 वर्षं दिली. RCBसोबतच मला हा क्षण जगायचा होता, आणि आज तो क्षण प्रत्यक्षात उतरला आहे”

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50
Next Post
Fact check: Viral YouTube claim about ₹500 note ban in 2026 is false, confirms PIB

मोठी अपडेट! ५०० रुपयांच्या नोटेबाबत केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp