Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंग्लंडचा न्यूझीलंडवर २० धावांनी विजय ; इंग्लंडच्या विजयाने यजमान ऑस्ट्रेलियाचेच टेन्शन वाढले…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 19:20

पुणे : इंग्लंडने ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचा २० धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारी इंग्लंड वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच आपल्या खऱ्या रंगात दिसली. या विजयाने ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढले आहे. ग्रुप १ मधील सर्व संघांचे प्रत्येकी ४ सामने झाले आहेत. सध्याच्या घडीला गुणतालिकेत न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे सामन म्हणजे प्रत्येकी ५ गुणांवर आहेत. मात्र सरस धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड अव्वल स्थानावर, इंग्लंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या तिघांमध्येच सध्या तरी सेमी फायनल पार करण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने २० षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंड संघ केवळ १५९ धावा करू शकला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, इंग्लंडने अखेरच्या पाच षटकात शानदार गोलंदाजी करत सामना २० धावांनी खिशात घातला. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाकडून ग्लेन फिलिप्सने ३६ चेंडूत ६२ धावा तडकावल्या. ख्रिस जॉर्डनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या गोलंदाज सॅम करनने त्याला लॉंग ऑनवर झेलबाद केले. याआधी ख्रिस वोक्सने डॅरिल मिशेलला तंबूत पाठवले. त्याचा झेलही जॉर्डनने लाँग ऑनवर घेतला तो काही काळासाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला होता. मिशेलला केवळ ३ धावा करता आल्या.

 

तत्पूर्वी, जोस बटलरने ४७ चेंडूत ७३ धावा करत मोलाचा वाटा उचलला. बटलरने ७३ धावांच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले. इंग्लंडला हा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर त्यांचे विश्वचषकातील आव्हान आजच संपुष्टात आले असते. लियाम लिव्हिंगस्टोनने १४ चेंडूत २० धावा केल्या आणि तो फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. न्यूझीलंडसाठी लॉकी फर्ग्युसन सर्वात यशस्वी ठरला. त्याने ४५ धावांत २ बळी घेतले. त्याच वेळी, ईश सोधी सर्वात किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले. त्याने ४ षटकात २३ धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

कौतुकास्पद..! गुळपोळी येथे तीन वर्षापासून दिव्यांग व्यक्तींना घरपोहोच रेशनचे धान्य वाटप..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.