Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिला पीएसआय वृषाली देसाईंवर निलंबनाची कारवाई; अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 19:32

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील अल्पवयीन मुलीने युवकाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सांगवी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास अधिकारी शिरवळच्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी फलटण पोलिस उपअधीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत.

खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील एका शाळकरी मुलीचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी अक्षय लांडगे याच्यावर २९ नोव्हेंबरला शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आपल्याविरुद्ध तक्रार दिल्याच्या रागातून ३० नोव्हेंबरला संशयित अक्षय लांडगे व त्याच्या दोन मित्रांनी येऊन पीडित शाळकरी मुलीच्या आईचा हात पकडून विनयभंग केला. पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेतली नाही तर मुलीला उचलून नेईन, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली, असे शाळकरी मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले होते. या घटनेमुळे शाळकरी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती.

संशयित अक्षय १४ डिसेंबरला जामिनावर सुटून बाहेर आला. त्यानंतर संशयित अक्षय हा मुलीच्या घराबाहेर दुचाकीवरून फिरू लागल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी (दि.१५) तपासी अंमलदार यांच्याकडे पुन्हा तक्रार केली. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.

याच दरम्यान, अल्पवयीन मुलगी चांगलीच घाबरली होती. कुटुंबीयांनी तिची समजूत काढून सर्वजण झोपी गेले असता मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

 

अक्षय पोपट लांडगे व त्याचे मित्र विकास भानुदास चव्हाण व निखिल यलाप्पा चव्हाण (सर्व रा. दत्तनगर, शिरवळ) यांना घाबरून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिस अधिक्षकांनी केली निलंबनाची कारवाई

तपासी अधिकारी महिलेने याकडे गांभीर्याने न पाहिल्याने ही घटना घडल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. त्यामुळे सांगवी ग्रामस्थ व महिला यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून संशयित आरोपीस कडक शिक्षा करा व तपासी अंमलदार यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. अखेर याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार २ हजार रुपये! राज्य सरकारची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Wednesday, 14 October 2026, 16:54

हाताला फ्रॅक्चर आणि उपचारादरम्यान मृत्यू ! दोन महिने झाले मग, पूजा गई यांना न्याय कधी?

Wednesday, 14 October 2026, 16:46

MPSC सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियारांकडे; पुण्यातील आंदोलनाला यश, आता पुढे काय?

Wednesday, 14 October 2026, 16:33

उरुळी कांचन पोलिसांना धक्काबुक्की करून शासकीय गाडीची केली तोडफोड! महात्मा गांधी शाळेच्या गेटसमोरील घटना

Wednesday, 14 October 2026, 16:23

NEET पेपरफुटीचा मोठा खुलासा! 14 व्या आरोपीवर आरोपपत्र; पेपर आधीच मिळवून विद्यार्थ्यांकडून वसूल केले पैसे

Wednesday, 14 October 2026, 15:44

मंत्रिमंडळ बैठकीतले धडाकेबाज निर्णय! जमीन महसूल अन् शेगाव देवस्थानासाठी मोठी घोषणा; नेमकं काय बदललं? वाचा सविस्तर…

Wednesday, 14 October 2026, 15:28
Next Post

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या; आमदार राहुल कुल यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp