Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंत्रिमंडळ बैठकीतले धडाकेबाज निर्णय! जमीन महसूल अन् शेगाव देवस्थानासाठी मोठी घोषणा; नेमकं काय बदललं? वाचा सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 14 October 2026, 15:28

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी जमिनींच्या वितरणासंदर्भातील नियमांत सुधारणा करण्यास आणि शेगावच्या यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयांमुळे बांधकामासाठी अयोग्य असलेल्या छोट्या सरकारी भूखंडांच्या वितरणाचे धोरण बदलणार असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

राज्य सरकारच्या मालकीच्या काही भूखंडांचा आकार लहान, चिंचोळा किंवा बांधकामासाठी अयोग्य असल्याने त्यांचा उपयोग करणे कठीण होते. तसेच काही भूखंडांना स्वतंत्र पोहोच मार्ग नसतो. अशा भूखंडांच्या वितरणासंदर्भातील धोरणात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील नियम ३७ आणि ३७ अ यांच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात येणार आहेत. हा निर्णय महसूल, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाशी संबंधित आहे.

श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांना बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा येथे यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 

संस्थानाला यापूर्वी वृक्षलागवडीसाठी १९ हेक्टर ६ आर जमीन देण्यात आली होती. या जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर क्षेत्रावर आता कायमस्वरूपी बांधकाम करता येणार आहे. या निर्णयामुळे यात्रास्थळावर येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदांवरील सलग २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ठराव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावाचे स्वागत केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

NEET पेपरफुटीचा मोठा खुलासा! 14 व्या आरोपीवर आरोपपत्र; पेपर आधीच मिळवून विद्यार्थ्यांकडून वसूल केले पैसे

Wednesday, 14 October 2026, 15:44

मंत्रिमंडळ बैठकीतले धडाकेबाज निर्णय! जमीन महसूल अन् शेगाव देवस्थानासाठी मोठी घोषणा; नेमकं काय बदललं? वाचा सविस्तर…

Wednesday, 14 October 2026, 15:28

लोणी काळभोर येथे इलेक्ट्रिक कारच्या धडकेत 62 वर्षीय भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू

Wednesday, 14 October 2026, 15:25

शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपये तर ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांना १२ सवलती; मंत्रिमंडळ बैठकीत देवाभाऊंनी घेतले शेतकऱ्यांसाठी धडाधड निर्णय

Wednesday, 14 October 2026, 15:02

पुण्यातील 100 नगरसेवकांना ‘ती ‘ चुक भोवली! भाजपकडून धडाधड कारणे दाखवा नोटीसा ; 5 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश, नेमकं काय घडलं?

Wednesday, 14 October 2026, 15:01

जन्मदात्रीने केला चक्क एका दिवसाच्या बाळाचा सौदा! अल्पवयीन असतांना गर्भवती राहिली अन् ४० हजारांना बाळ विकलं

Wednesday, 14 October 2026, 14:59
Next Post

NEET पेपरफुटीचा मोठा खुलासा! 14 व्या आरोपीवर आरोपपत्र; पेपर आधीच मिळवून विद्यार्थ्यांकडून वसूल केले पैसे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp