Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाळकीत लाडक्या बहिणी दारुबंदीसाठी आक्रमक; बेमुदत उपोषणाचा इशारा…

गणेश सूळby गणेश सूळ
Friday, 30 August 2024, 15:27

केडगाव : दौंड तालुक्यातील वाळकी येथील संपूर्ण दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. तातडीने कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाला वेळोवेळी येथील महिलांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या राहू येथे आल्यानंतर त्यांना देखील वाळकीतील महिलांनी निवेदन देत दारू धंदे बंद करण्याची मागणी केली होती. पोलीस प्रशासनाने यावेळी तूटपुंजी कारवाई करत हात झटकले आहे.

नुकत्याच झालेल्या वाळकी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये महिलांनी हजेरी लावली. मात्र कोरम अभावी सभा तहकूब झाली. आक्रमक झालेल्या महिलांनी आडवी बाटली करण्याचा निर्धार केला आहे. पुढची ग्रामसभा चार सप्टेंबर रोजी होणार असून या सभेत आडव्या बाटलीचा ठराव करणार असल्याचे महिलांनी सांगितले. अवैध दारू विक्रीमुळे गावातील अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. याचा त्रास महिला, शाळकरी मुला -मुलींना सहन करावा लागत आहे. यामुळे गावातील तरुण आणि महिलांनी गावातील बेकायदेशीर दारूचे अड्डे उध्वस्त करा, अवैध धंदे बंद करा अशी मागणी केली आहे. गावातून दारू कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सरपंच ज्योती थोरात, ग्रामपंचायत सदस्या मोनिका हांडे, उषा भालेराव, अंगणवाडी सेविका अंबिका शिंदे, मालन भालेराव, नंदा भालेराव, जाहिरा शेख, मनीषा थोरात, दुर्गा थोरात, जयश्री वाघमारे, राणी साळुंखे आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोरात, उपसरपंच सुरेश कदम, पोलीस पाटील निळकंठ थोरात, ग्रामसेवक एस.एस. सय्यद, जनार्धन थोरात, नाना चोरमले, दिलीप हाके, निखिल थोरात आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

वाळकी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून दारुमुळे अनेक महिलांचे संसार देशोधडीला लागले आहेत. मात्र पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. पोलीस प्रशासनाने व राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची गंभीर दखल घ्यावी.
– ज्योती थोरात- सरपंच वाळकी

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

धक्कादायक..! चॉकलेट चोरल्याच्या संशयातून चिमुकल्याला बांधले झाडाला; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp