Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिराने केला भावजयीचा गळा दाबून खून; सात वर्षाच्या मुलीने घटनाक्रम सांगितल्याने खरा सूत्रधार आला पुढे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 August 2024, 19:06
woman murdered by brother in law in pune

पुणे : घरगुती भांडणातून भावजयीचा गळा दाबून खून करणाऱ्या दिराला अटक केली आहे. लहान मुलीने घटनेअगोदर काय घडले, हे सांगितल्याने खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत झाली. कविता नागराज गडदर (वय २४, रा. साईबाबा कॉलनी, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर (वय २३, रा. साईबाबा कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्या दिराचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक संजय सिद्धेश्वर माळी यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. घरातील सात वर्षांच्या मुलीमुळे हा खुनाचा प्रकार समोर आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता नागराज गडदर ही राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. तिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिचा गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. दरम्यान, सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन कर्नाटकातील गावी गेले होते. हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यांना गावाकडून बोलावून घेतले.

मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब निकम यांनी सांगितले की, कविता हिचा पती कामानिमित्त गावी गेला होता. घरामध्ये कविता, तिची मुले आणि दीर हे होते. कविता हिची सात वर्षांची मुलगी घरात होती. मल्लिकार्जुन याने तिला खेळण्यासाठी घराबाहेर जाण्यास सांगितले. ती घराच्या बाहेर गेल्यावर त्याने कविता हिचा गळा दाबून तिचा खून केला. मुलीने आपल्याला घराबाहेर जाण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. मल्लिकार्जुन गडदर याचे घरगुती कारणावरून भांडण झाले होते. तो सेंट्रिंगचे काम करतो. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यावरून त्यांच्यात भांडणे होत होती. या कारणावरून त्याने कविताचा गळा दाबून खून केला.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02
Next Post

पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेतीचा ट्रॅक्टर पकडला; ६ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.