Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहाची वानवा; महिला, ज्येष्ठांची कुचंबणा ; भाजपचे सरपंचांना निवेदन!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 July 2023, 18:22

Uruli Kanchan News लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पीएमपीएल बस स्थानकाच्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.  (Uruli Kanchan News) बस स्थानकाजवळ त्वरित स्वच्छतागृह उभारावे आणि ज्येष्ठ तसेच महिला प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उरुळी कांचन शाखेने केली आहे. (Uruli Kanchan News)

उरुळी कांचन भाजपच्या वतीने सरपंच भाऊसाहेब कांचन यांना निवेदन 

उरुळी कांचन भाजपच्या वतीने या मागणीचे निवेदन सरपंच भाऊसाहेब कांचन यांना बुधवारी (ता. १२) देण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा युवती अघाडी उपाध्यक्ष पूजा सणस, भाजपचे उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित सतीश कांचन, हवेली तालुका झोपडपट्टी सुरक्षा दल अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, विवेक कांचन, अक्षय रोडे, गणेश घाडगे, अजिंक्य कांचन, नीलकंठ सूर्यवंशी, काजल खोमणे, साक्षी कांचन व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. याठिकाणी राष्ट्रीयीकृत, सहकारी, जिल्हा बॅंका, आरोग्य केंद्र, महावितरण कार्यालय, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालय असल्याने दररोज हजारो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा असते. उरुळी कांचन बाजारपेठेत परिसरातील ३० ते ३५ गावांतील ग्रामस्थ, महिला खरेदीसाठी येतात. तसेच नोकरवर्ग, खासगी डॉक्‍टरकडे येणारे रुग्ण तसेच अन्य कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा सतत राबता असतो. परंतु गावातील पीएमपीएल बस स्थानकावर आल्यानंतर स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

दरम्यान, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन उरुळी कांचन भाजपच्या वतीने सरपंच भाऊसाहेब कांचन यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या सेवेसाठी लवकरात स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना पूजा सणस म्हणाल्या की, सद्यःस्थितीत उरुळी कांचन येथील पीएमपीएल बस स्थानकाजवळ महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला, तसेच शाळकरी विद्यार्थिनींना ओळखीच्या व्यक्तींना विनंती करून त्यांच्या व्यक्तिगत स्वच्छतागृहाचा वापर नाइलाजाने करावा लागत आहे. अनेकदा नैसर्गिक विधीचा रोखल्याने आजारांना बळी पडावे लागते. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन, बस स्थानकाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी त्वरित प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

 

स्वच्छतागृहाअभावी होणाऱ्या गैरसोयीबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले की, उरुळी कांचन येथील पीएमपीएल बस स्थानकाच्या परिसरात कोणतीही शासकीय अथवा सार्वजनिक जागा उपलब्ध नाही. जागा उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतागृह बांधून दिले जाईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बुधवार पेठेत FDAची धडक कारवाई; तब्बल 2.88 लाखांची मिठाई नष्ट, 8 दुकानांची तपासणी

Saturday, 28 November 2026, 16:08

पावसाच्या बोगस अंदाजाने शेतकऱ्यांचे नुकसान? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Saturday, 28 November 2026, 15:52

NCMC कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 50 रुपयांची अट संपली, आता फक्त 5 रुपयांत होणार रिचार्ज

Saturday, 28 November 2026, 15:41

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32

निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यांची आता खैर नाही! पुणे महापालिकेचा नवा नियम; बिल काढण्याआधी गुणवत्ता तपासणी बंधनकारक

Saturday, 28 November 2026, 14:29

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22
Next Post

Shirur News : शिक्रापुरात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp