Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बनावट अध्यादेश काढून वेतनवाढ मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस; एसीबीची मोठी कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 5 February 2025, 15:35
Chhatrapati sambhajinagar deputy district collector caught by acb due to taking bribe

पुणे : बनावट अध्यादेश काढून पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डाॅ. दीपक चांदणे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमाेल भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण विभागाचे सचिव प्रविण मुंढे यांच्या नावाचा बनावट अध्यादेश काढण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. या प्रकरणामध्ये डॉ. चांदणे याच्याबरोबरच अनेक जण यामध्ये सहभागी असावेत असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून डाॅ. चांदणे यांनी शिक्षकांकडून १७ लाख रुपये गोळा केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. हा प्रकार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात १९ ऑक्टोबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ काळात घडला आहे. त्याबाबत तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास केला. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमिक शाळांमधील ‘एटीडी’ पदविका मिळवलेल्या अपदवीधर कला शिक्षकांनी ‘एएम’ ही पदवी मिळवल्यानंतर वरिष्ठ पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला होता. डॉ. दीपक चांदणे यांच्याकडून आपली शिक्षण विभागामध्ये ओळख असल्याचे भासवण्यात आले.

त्यांनी शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने हेतूने अन्य आरोपींच्या मदतीने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचे अतिरिक्त सचिव प्रविण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करुन बनावट शासन निर्णय तयार केला. या बनावट शासन निर्णयाचा संदर्भ टाकून शिक्षणाधिकारी यांच्या बनावट सह्यांचा बनावट आदेश तयार केला. त्यासाठी डॉ. दीपक चांदणे याने शिक्षकांकडून एकूण १७ लाख रुपये गोळा केले.

बनावट शासन निर्णय समाज माध्यमात प्रसारित झाला. ही बाब शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या निदर्शनास आली. त्याची छाननी करण्यात आल्यानंतर संबंधित शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोठेही आढळून आलेला नाही. अतिरिक्त सचिव प्रविण मुंढे यांच्या बनावट स्वाक्षरीने हा खोटा आदेश काढण्यात आल्याची बाबही उघड झाली.

त्यानंतर डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या महिन्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या शिक्षकांशी, मुख्याध्यापकांकडे चौकशी केली. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

टाटा समूहाची 'ही' कंपनी एटीएम व्यवसायातून पडली बाहेर; RBI नेही दिली मान्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.