Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत बदल; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 June 2025, 8:59

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पुण्यात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीहून पुण्यात येणार असल्याने, पुणे शहर वाहतूक पोलिसांनी २० ते २३ जून या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या शहरात प्रवेश करणार असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

 

पर्यायी मार्ग 

  • जड वाहनांना प्रवेशबंदी: पालखी सोहळ्याच्या काळात शहरात जड वाहनांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

  • पालखी मार्गावरील रस्ते बंद: पालखी ज्या मार्गावरून जाणार आहे, ते प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे किंवा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये बोपोडी, खडकी, वाकडेवाडी, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, बुधवार पेठ, नानापेठ, बेलबाग चौक आणि पासोड्या विठोबा मंदिर परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (आज, २० जून): आज पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील बोपोडी ते खडकी बाजार रस्ता, तसेच जुन्या मुंबई-पुणे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.

  • पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी भाऊ पाटील रस्ता, आरटीओ चौक, पर्णकुटी चौक या मार्गांचा वापर करावा.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (आज, २० जून):  आज दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत आळंदी, वडमुखवाडी, विश्रांतवाडी, पाटील इस्टेट या मार्गावरील वाहतूक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या आगमनामुळे बंद राहील.

  • पर्यायी मार्ग: धानोरी, येरवडा कारागृह रस्ता, पर्णकुटी चौक आदी मार्ग खुले असतील.

शहरातील महत्त्वाच्या चौकांतील बदल: गर्दी टाळण्यासाठी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत संचेती चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, जिजामाता चौक, बेलबाग चौक ते निवडुंग्या विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिरापर्यंतच्या मार्गावर वाहतूक बंद असणार आहे.

  • पर्यायी मार्ग: सेनापती बापट रस्ता, नळ स्टॉप, शास्त्री रस्ता, रांका चौक, रामेश्वर चौक, फडके हौद चौक या मार्गांचा वापर करता येईल.

पोलिसांचा बंदोबस्त आणि आवाहन:

पालखी मार्गावर शहर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक शाखेने भाविकांना आणि नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, तसेच पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पालख्यांसोबत येणाऱ्या वाहनांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असेही वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. या बदलांमुळे पुणेकरांना थोड्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, मात्र सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

सोलापूर हादरले! एकाच ओढणीने, एकत्र गळफास घेत आयुष्य संपवलं; चिठ्ठीत लिहिले ‘आम्ही भाऊ-बहीण'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.