Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सापांच्या संख्येत दिवसेंदिवस होतीये घट ; वनविभागाकडून सर्पदंशाबाबत जनजागृतीची गरज

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 31 August 2023, 21:03

गणेश सुळ
केडगाव : सापांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण सोमवारानंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र, आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही, तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे.

शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने साप हा मित्र आहे. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासह महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या सापाला अनेकदा मारले जाते. मात्र, सर्पमित्र साप संवर्धनासाठी मोठी मेहनत घेत आहेत. अनेक नागरिक साप निघाल्यानंतर तत्काळ सर्पमित्रांना फोन करून बोलावीत असल्यामुळे अनेक सापांना जीवदान मिळत आहे. असे असले तरी आजही अनेक ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. पण, सापांचे असणारे महत्त्व लक्षात घेता आज प्रशासनाने व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.

तसेच वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी विविध प्रशिक्षणे राबविण्याची गरज आहे. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापांचे निसर्गातील असलेले महत्त्व, सर्पदंशानंतर करण्यात येणारे प्रथमोपचार यासाठी वनविभागाकडून जनजागृती करण्याची गरज आहे.

 

शासनाकडून सर्पमित्र दुर्लक्षितच

वास्तविक, वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी वन विभागाची असते; परंतु सापांच्या संरक्षणाच्या बाबतीत हा विभाग उदासीन दिसून येतो. सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून साप पकडतात. पकडलेल्या सापांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊ देता त्या सापांना सुरक्षितस्थळी सोडले जाते. विना मोबदला सापांच्या प्रति असलेल्या प्रेमापोटी ही मंडळी रात्रदिवस साप वाचविण्याचे काम करतात. वन्यजीव संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च करणारे सरकार मात्र या सर्पमित्रांना दुर्लक्षितच ठेवत आहे. अनेक सर्पमित्रांना साप पकडण्यासाठी लागणारी कुठलेही सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत.

पृथ्वीवर मनुष्याप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. कधी-कधी मनुष्याच्या चुकीमुळे प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागते. पावसाच्या दिवसांत वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी बाहेर येतात. या दिवसांत मुख्यतः साप बाहेर निघतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे सापाला इजा न करता वन विभाग किंवा सर्प मित्रांना सूचना द्यावी.

– मेघराज पारसे, सर्पमित्र, खुटबाव (दौंड)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

खडकवासला बीबीसी कालवा अस्तरीकरण करावे; दौंड पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.