अमित मुंडिक

पुणे : सिंहगड रोडवरील नांदेड सिटी परिसरात आज सकाळी एक गंभीर अपघात घडला. एका बांधकामस्थळी सुरू असलेल्या कामादरम्यान अचानक मोठा मातीचा ढिगारा कोसळल्याने तीन कामगार त्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन विभाग व पीडीआरएफ (PDRF) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी मोठा बंदोबस्त असून, स्थानिक नागरिकांनी देखील बचावकार्यात मदत करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमकं बांधकाम कोणत्या संस्थेच्या अंतर्गत सुरू होतं, याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे. मिळालेल्या माहिती नुसार, या घटनेत आतापर्यंत दोन कामगारांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं यश आलं तर एका कामगाराच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.







