यवत (पुणे): यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी मधील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून फिर्यादींना केला परत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडीचे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुन्हेगारांची एमओबी नुसार माहीती काढुन आरोपींना अटक करून यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी मधील एकूण १४ गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते या आरोपींकडुन १४ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता. यातील सोन्या चांदीचे दागिनेसह काल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यवत पोलीसांकडुन सर्व फिर्यादींना पोलीस स्टेशनला बोलावून रितसर प्रक्रियेने त्याचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने अनेक नागरिकांनी यवत पोलीस स्टेशनचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, सहाय्यक फौजदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, विजय कांचन, धिरज जाधव, संदीप देवकर, गुरूनाथ गायकवाड, गणेश कुतवळ, अक्षय यादव, विकास कापरे, दत्ता काळे, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, सुभाष शिंदे, मारूती बाराते, अमोल भुजबळ, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली होती.








