Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्ह्यांतर्गत बदली टाळण्यासाठी बहुतांश शिक्षकांचे ‘गोलमाल’; सादर केली बोगस प्रमाणपत्रे, ‘सीईओं’च्या करवाईकडे सर्वांचे लक्ष

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 June 2025, 12:41
some teachers submitted fake certificates for transfer in haveli pune

पुणे : जिल्ह्यांतर्गत बदली टाळण्यासाठी हवेलीतील शिक्षकांनी एक नवीन फंडा अवलंबला आहे. शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे शासन दप्तरी सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोगस प्रमाणपत्र धारक शिक्षकांना जर विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मध्ये लाभ दिला, तर खरे लाभार्थी शासनाच्या या योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विद्येच्या माहेरघरातच हा प्रकार उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीच्या धोरणानुसार ‘विशेष संवर्ग शिक्षक भाग-१’ मधील शिक्षकांना बदलीतून सूट दिली जाते. यामध्ये आजारग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक, परित्यक्ता, घटस्फोटित महिला शिक्षक, ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, कुमारिका शिक्षक, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादींचा विशेष संवर्गात समावेश केला जातो. मात्र, विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यामध्ये हवेली तालुक्यातील शिक्षक अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.

हवेलीतील बोगस प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी शासनाकडून त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. यामध्ये हवेली शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी व आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने प्रत्यक्षात कागदपत्रांची पडताळणी केलेली नाही. मात्र, या समितीने केलेल्या तपासणीमध्ये एकही शिक्षक दोषी आढळला नाही. त्यामुळे या प्रकरणात अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठी माया गोळा केली असल्याची जोरदार चर्चा शिक्षकांमध्ये रंगली आहे.

दरम्यान, आळंदी म्हातोबाच्या परिसरात एक शिक्षिका अडीच ते तीन वर्षानंतर कामावर रुजू झाली आहे. संबंधित महिला शिक्षकाने बदली टाळण्यासाठी तिच्या मुलाचे अपंगत्व प्रमाणपत्र तयार केले आहे. तसेच हवेलीतील अनेक शिक्षकांनी एकाच वकिलाकडून नोटरी स्वरुपात पती अथवा पत्नीपासून विभक्त राहत असल्याचे लिहून घेतले आहे. परित्यक्ता असल्याचे लिहून घेतले असले, तरी त्या पतीसोबतच एकत्र राहत आहेत. अनेक शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतले आहे. पण त्याची त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद नाही.

बदलीसाठी मोठी माया गोळा झाल्याची चर्चा
ज्या शिक्षकांना बदली हवी आहे, त्या शिक्षकांसाठी हवेलीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका हॉटेलवर बैठक बोलावली होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत बदलीसाठी मोठ्या आकड्यांची गुपचूप बोली लागली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने समझोता करून मोठी माया गोळा केली आहे. त्याचबरोबर ‘विशेष संवर्ग शिक्षक भाग-१’ मधील शिक्षकांना बदलीतून सूट देण्यासाठी देखील या अधिकाऱ्याने मोठी आर्थिक मांडवली केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील या आकावर कारवाई कधी होणार? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागणार आहोत, असे काही शिक्षकांनी सांगितले आहे.

हवेलीत कारवाई होणार?
दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून, त्यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. तसेच, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विशेष संवर्गाद्वारे बदलीपासून संरक्षण कसे दिले, याचाही खुलासा करावा. बदली टाळण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचा संशय असलेल्यांची फेरतपासणी करावी, असे आदेशही ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हवेलीतील खोटी प्रमाणपत्रे सदर करणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई होणार की, त्यांना नेहमीप्रमाणे अभय दिले जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे हवेलीतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शासन परिपत्रक काय म्हणते?
विशेष संवर्ग-१ मधील घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळल्यास घटस्फोट प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत, स्वयंघोषणापत्र, रहिवास दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका इत्यादीवरून पडताळणी करावी. आवश्यकतेनुसार निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करावी. शिक्षकाच्या दिव्यांगत्वबाबत किंवा आजाराबाबत काही साशंकता आढळल्यास, संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून तपासणी करावी. दिव्यांग प्रमाणपत्र देताना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन झालेले असावे. स्वयंघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचे आढळून आल्यास, अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच संबंधित शिक्षकाचे निलंबन करून शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

वरंध घाट तीन महिन्यांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp