Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरूर तालुक्यातील तलाठ्यांच्या गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गांभीर्याने दखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 September 2023, 12:00

संदीप टूले

Shirur News : केडगाव : शिरुर तालुक्यातील काही तलाठ्यांनी शासकीय दप्तरात खाडाखोड केली. एक व दोन गुंठ्याचे स्वतंत्र तुकडे पाडून बेकायदेशीर नोंदी घातल्या. वरिष्ठांनी या नोंदी मंजूर देखील केल्या. काही तलाठ्यांनी फक्त साठेखतावरून सातबारा तयार केले व शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याची लेखी तक्रार देण्यात आली होती. शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने, या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी (कुळकायदा) भोरडे यांना पत्राद्वारे कळवले आहे.

दप्तर तपासणीमुळे महसूलचे धाबे दणाणले

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी शिरुर तालुक्यातील पाच तलाठ्यांच्या दप्तर तपासकामी स्वतंत्र पथक तयार केले. (Shirur News) या तपासणी पथकाचे प्रमुख म्हणून तहसीलदार (संगायो) अजित पाटील आणि नायब तहसीलदार (अप्पर तहसील पिंपरी-चिंचवड) प्रविण ढमाले होते. तपासणी अधिकारी, कर्मचारी म्हणून अव्वल कारकून राजकुमार लांडगे, काकासाहेब शिक्केतोड, सचिन चव्हाण, जितेंद्र पाटील, महसूल सहायक अलीमोद्दीन काझी, रोहन देवरे यांचे पथक तयार करुन, शिरुर तालुक्यातील त्या पाच तलाठ्यांच्या दप्तर तपासणीचे आदेश दिले होते.

 

शिरुर तालुक्यातील काही तलाठ्यांनी शासकीय दप्तरामध्ये खाडाखोड केली. तसेच एक व दोन गुंठयाचे स्वतंत्र तुकडे पाडून नोंदी घातल्या. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजुरही केल्या. काही तलाठ्यांनी फक्त साठे खतावरुन सातबारे तयार केले व शासनाचा महसूल बुडविला. तसेच काही सामाईक खरेदी खतामध्ये खरेदी दस्तामध्ये दहा लोकांची नावे असताना त्यामधील एक नाव वगळून खरेदी खतामध्ये नसलेली पाच नावे त्यामध्ये जाणीवपूर्वक टाकून एकूण १४ लोकांचे खरेदीखत आहे, असे दाखवून सातबारा तयार केला. (Shirur News) तसेच शासनाची फसवणूक केल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्यासह इतर प्रशासकीय कार्यालयात केली होती.

शिरुर तालुक्यातील काही गावांतील तलाठ्यांनी स्वतःच्या कार्यालयात खासगी झिरो तलाठी नेमले असून, तेच सर्वसामान्य लोकांची आर्थिक लूट करत आहेत. तसेच काही तलाठी त्यांच्या हद्दीत गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक सुरु असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल त्यांनी बुडविलेल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी करुन, या कामी शासनाचे लक्ष वेधले होते.

या तक्रारीची दखल घेऊन, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्वतंत्र पथकाची नेमणूक करुन दप्तर तपासणीचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने दप्तर तपासणी केल्यानंतर अशोक भोरडे यांनी केलेल्या तक्रारी व आरोपांमध्ये तथ्य आढळून आले. (Shirur News) पुणे उपजिल्हाधिकारी (कुळकायदा) यांनी भोरडे यांना आपण केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाकडे पाठविला आहे. महसूल विभागाने तो अहवाल संबंधित तलाठ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उपविभाग पुणे यांच्याकडे संबंधित तपासणी अहवाल तसेच कारवाई करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

शिरुर तालुक्यातील संबंधित तलाठ्यांच्या विरोधात कोणती व कशी कारवाई करणार…? की त्यांना अभय देणार याकडे संपूर्ण शिरुर तालुक्यातील जनतेसह पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाचे लक्ष लागले आहे. शिरुर तालुक्यातील अनेक मोठे मासे आता महसूल विभागाच्या गळाला लागणार आहेत.

– अशोक भोरडे, सामाजिक कार्यकर्ते

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : रांजणगावात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना बेड्या

Shirur News : सरपण आणण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा विनयभंग ; तरुणावर गुन्हा दाखल..

Shirur News : काँग्रेसनंतर भाजपकडूनही जनतेचा भ्रमनिरास; सत्ताधाऱ्यांवर तरुणाई नाराज; जनस्वराज्य यात्रेदरम्यान महादेव जानकर यांची टीका

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Shirur News : पाबळ येथील जिजाबाई थिटे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.