Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवारांच्या मंचरमधील सभेत शरद पवारांचा जयघोष; दिलीप वळसेंच्या मतदारसंघात दुसऱ्यांदा प्रकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 March 2024, 9:26

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आंबोगावातील मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवारांचा जयघोष झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले. मात्र, दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. त्यामुळे वळसे पाटलांना आंबेगावचा गड राखणे जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मंचर येथे ४ मार्च रोजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. त्यावेळी स्टेजवर जुन्नरचे आमदार अतुल बेनके बोलत असताना खालून एका व्यक्तीने शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. बेनके यांनी त्याकडे लक्ष देऊ नका, असे सांगत लाऊड स्पीकरच्या आवाजात ही घोषणाबाजी दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाजूच्या एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीला बाजूला नेले. अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या सभेमध्ये थेट शरद पवारांच्या नावाचा जयजयकार केल्याचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. घोषणाबाजी करणारी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा आहे. तर काहींनी त्या व्यक्तीला नंतर मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे.

शिरूर तालुक्यातील पाबळ गावात बैलगाडा शर्यत प्रसंग दिलीप वळसेंना शरद पवारांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. वळसे पाटील हे त्या ठिकाणच्या पाणी प्रश्नाबाबत बोलत असताना, शरद पवारांच्या नावाचा जयघोष झाला. त्यावेळी दिलीप वळसेंवर भाषण आटोपते घेण्याची वेळ आली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत गेले. दिलीप वळसे शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाहीत, असे म्हटले जात होते. मात्र, वळसे पाटलांच्या निर्णयामुळे खुद्द शरद पवारांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळेच दिलीप वळसेंच्या मतदारसंघात सभा घेऊन शरद पवारांनी त्यांना पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. ज्या व्यक्तीला आपण सर्व काही दिले, त्या व्यक्तीने आपल्याला फसवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

मद्यधुंद चालकाचा कहर... पिंपरीत बीआरटी मार्गात विरुद्ध दिशेने कंटेनर सुसाट; बस स्टॉपला धक्का, बॅरिगेटही तोडले, अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp