Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे रविवारी शरद पवारांची तोफ धडाडणार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 27 April 2024, 18:28
Sharad Pawar criticized central and state government in baramati

उरुळी कांचन: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शरद पवार यांची रविवारी (ता. २८) पाच वाजण्याच्या सुमारास सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार गट) पार्टीचे उरुळी कांचन शहराध्यक्ष रामदास तुपे व सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी दिली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची उरुळी कांचन येथील बस स्थानकाच्या परिसरात सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, सचिन आहेर, देविदास भन्साळी, शरद पवार गटाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप गोते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याबाबत बोलताना रामदास तुपे व भाऊसाहेब कांचन म्हणाले, उरुळी कांचन येथील शरद पवार यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सभेला शिरूर, हवेली तालुक्यातील हजारो नागरिक सभेला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे सभेला येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सभेच्या ठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्थादेखील केली आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदार संघात खरी लढत डॉ. अमोल कोल्हे व भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायु‌तीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणार आहे. त्यामुळे उरुळी कांचन येथील सभेत शरद पवार आपली भूमिका काय मांडणार व मतदानाचा कौल कसा आपल्या बाजूने फिरवणार ते पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. त्यामु‌ळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत शाळेच्या कार्यालयात शिक्षकाला बेदम मारहाण; दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Wednesday, 28 October 2026, 20:13

भीषण अपघात! पोखरी घाटात 150 फूट खोल दरीत कोसळली इको गाडी; 2 जणांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी

Wednesday, 28 October 2026, 18:52

ठाकरे गटातून शिंदेसेनेत गेलेल्या 6 खासदारांवर टांगती तलवार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल

Wednesday, 28 October 2026, 18:33

वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने पूर्ण केले; हर्षदा जाधव-देशमुख यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात विजय

Wednesday, 28 October 2026, 18:19

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

Wednesday, 28 October 2026, 17:33

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

Wednesday, 28 October 2026, 17:31
Next Post
Bhosari Constituency is king maker in Shirur Says MLA Mahesh Landge

शिरुरमध्ये भोसरी मतदारसंघ महायुतीसाठी ‘किंगमेकर’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp