Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडी येथे किरकोळ कारणावरून एकाच्या पोटात खुपसली कात्री

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 8 July 2025, 20:16

लोणी काळभोर, ता. 8 : ‘तु मला शिव्या नको देवूस’ असे म्हणाल्याने एकाच्या पोटात कात्री खुपसल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल ७७ च्या पाठमागे रविवारी (ता.6) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित दमोदर कुंजीर (वय-३६, मु.पो. कुंजीरवाडी ग्रामपंचायतच्या पाठीमागे, ता. हवेली, जि-पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्याच्यावर कुंजीरवाडी परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मारुती गलांडे (रा- मु.पो. कुंजीरवाडी ता. हवेली, जि-पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित कुंजीर हे नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेताकडे चालले होते. शेतीकडे जाणाऱ्या सामाईक रस्त्याने जात असताना, मारुती गलांडे व त्याचे मित्र गप्पा मारत बसले होते. त्या सर्वांना पाहुन फिर्यादी हे त्यांच्या जवळ गेले होते. तेव्हा मारुती गलांडे हा फिर्यादी अजित कुंजीरला पाहून म्हणाला, ” तु सारखा सारखा इकडुन का येत आहेस, तुझ्या मुळे माझे हॉटेल बंद पडले. माझे एवढे मोठे नुकसान झाले” असे म्हणाला.

‘तु मला शिव्या नको देवूस’ असे फिर्यादी कुंजीर म्हणाल्याचा राग मनात धरून मारुती गलांडे याने गुलाबाचे रोप कट करण्याची कात्री कुंजीर यांच्या पोटात खुपसली. तसेच कुंजीर यांना विटेनी मारहाण केली. या मारहाणीत कुंजीर यांच्या पोटातून रक्तस्त्राव होऊ लागला.

त्यानंतर तेथील मित्रांनी कुंजीर यांना उपचारासाठी कुंजीरवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून कुंजीर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.

दरम्यान, या प्रकरणी अजित कुंजीर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारुती गलांडे याच्या विरोधात भारतीय न्यास संहिता २०२३ चे कलम ११८ (१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27
Next Post

राज्यातील सर्व सामाजिक योजना आता एकाच पोर्टलवर; लाभार्थ्यांसाठी सुव्यवस्थित मार्गदर्शन केंद्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.