Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम; जागतिक दर्जाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत गाठले यशोशिखर

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 13 December 2023, 16:06

लोणी काळभोर : जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाचा अडसर कधीच येत नाही. तुम्ही ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचू शकता. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखविले आहे. जागतिक दर्जाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत या शेतकऱ्याने तृतीय क्रमांक मिळवून यशोशिखर गाठले आहे. राजेंद्र परसराम गायकवाड असे या मेहनती शेतकऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजेंद्र गायकवाड हे लोणी काळभोर येथील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. १९९१ साली गायकवाड यांच्या घरावर दरोडा पडला होता. यावेळी त्यांना बेदम मारहाण झाली होती. या मारहाणीत गायकवाड यांच्या कानाजवळची शीर ब्लॉक झाली होती. तेव्हापासून गायकवाड यांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. अनेक औषधोपचार करूनही त्यांची या आजारापासून सुटका झाली नाही. या आजारासाठी गायकवाड यांनी तब्बल २० वर्षे वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या. एवढेच नव्हे तर डोकेदुखीसाठी त्यांना खिशात बामची बाटली कायम ठेवावी लागत असे. त्यानंतर २०१० पासून त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. या सततच्या आजारपणाला गायकवाड कंटाळले होते.

एका बॉडी बिल्डरची जन्मकथा…
राजेंद्र गायकवाड हे सतत आजारी असायचे. मग अनेकांना प्रश्न पडतो, अशी व्यक्ती वयाच्या ५२ व्या वर्षी बॉडी बिल्डर होऊन शरीर सौष्ठव स्पर्धा कशी गाजवू शकते? तर, गायकवाड यांचा पहिलवान होण्याचा प्रवास चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ पासून सुरू झाला. गायकवाड हे थेऊर फाटा येथे मित्राच्या दुकानात बसले होते. त्यावेळी ते मोबाईलवर शरीर सौष्ठव स्पर्धेचे व्हिडिओ पाहत होते. एका मित्राने त्यांची चेष्टा केली. गंमतीत त्यांना विचारले की, ‘असले व्हिडिओ तू कशाला पाहतोस? आधी तुझे शरीर बघ…’ या चेष्टेमुळे गायकवाड दुखावले गेले. त्याचवेळी चार मित्रांची तब्बल दोन लाखांची पैज लागली. ‘तू बॉडी बिल्डर होऊन दाखव,’ असे आव्हान मित्रांनी गायकवाड यांना दिले आणि या गंमतीतूनच बॉडी बिल्डर गायकवाड यांचा जन्म झाला.

 

महिनाभरात रामदरा डोंगरावर यशस्वी चढाई
पैज जिंकण्याच्या जिद्दीपोटी गायकवाड यांनी तातडीने त्यांचे मार्गदर्शक व कुंजीरवाडी गावचे माजी सरपंच तथा गिर्यारोहक सचिन तुपे यांची भेट घेतली. मला व्यायाम सुरु करून बॉडी बिल्डर व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सचिन तुपे गायकवाड यांना घेऊन रामदरा डोंगर चढण्यसाठी गेले. त्यावेळी गायकवाड हे फक्त ३०० मीटर डोंगर चढू शकले आणि माघारी आले. दरम्यान, त्यांच्या सर्व मित्रांनी पुन्हा ‘ही पैज तू हरणार’ म्हणत त्यांना डीवचले. गायकवाड यांनी मित्रांचे बोलणे मनावर घेत एकट्यानेच रामदरा डोंगर चढण्याचा सराव सुरू केला. एक महिन्यानंतर गायकवाड यांनी स्वतः तुपे यांना सांगितले मी, आता मी तुमच्यासोबत रामदरा डोंगर चढण्यास सज्ज आहे. पुढे सर्व मित्र रामदरा डोंगर चढू लागले.

… अन् मित्रांसोबत लावलेली पैज जिंकली!
पहिलवान होण्याची जिद्द गायकवाड यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी राजेंद्र गायकवाड यांनी हडपसर येथे जिमला जाण्यास सुरूवात केली. अवघे २२ वर्षे वयाचे प्रशिक्षक ओमकार जगताप यांच्याकडे प्रशिक्षण घेऊ लागले. गायकवाड यांनी आहार, व्यायाम व जिद्दीच्या जोरावर वजन नियंत्रित केले. मित्रांसोबत लावलेली पैज अखेर गायकवाड यांनी जिंकून दाखवली. आता मित्रांनीच गायकवाड यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यायामाला सुरवात केली आहे.

पालकांनो, मुलांच्या व्यायामाकडे लक्ष द्या!
दरम्यान, गोवा येथे नुकतीच जागतिक दर्जाची ‘मी नैसर्गिक’ स्पर्धा (ICN) पार पडली. या स्पर्धेत जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत राजेंद्र गायकवाड हे पहिल्यांदाच सहभागी झाले होते. गायकवाड यांनी या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबाबत बोलताना राजेंद्र गायकवाड म्हणाले की, शारीरिक व्याधींमुळे मी ग्रासलो होती. त्यातून बाहेर पाडण्यासाठी वयाच्या ४८ साव्या वर्षी व्यायाम करण्यास सुरवात केली. यासाठी सचिन तुपे व राजेंद्र गायकवाड यांनी योग्य मार्गदर्शन केले. यामुळेच मी जागतिक दर्जाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. याचा मला आनंद झाला आहे. तसेच व्यायामामुळे माझे शरीर सदृढ झाले असून, माझ्या व्याधीदेखील संपल्या आहेत. आजच्या पालकांनी मुलांच्या व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38
Next Post

Gutami Patil On Reservation : 'मलाही आरक्षण हवंय'...मराठा आरक्षणावर गौतमी पाटीलच वक्तव्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.