पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी पोलीस हद्दीतील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत यासाठी व सासवड पोलीस स्टेशनने पकडलेल्या १ कोटींचा गुटखा पकडला होता याची उच्चस्तरीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्यावतीने, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु आहे याची सुरुवात जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी जेजुरी यांच्या जागरण गोंधळ आंदोलनांनी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतिश केदारी यांनी केले . रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी आंदोलनाचे आयोजन केले होते.

यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड , जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गंगाराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाचे तालुका अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते तानाजी भालेराव, राष्ट्रीय समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष खोमणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे नेते अँड. अरुण सोनवणे, माजी तहसिलदार मधुकर कांबळी, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी सुनिल जगताप, पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बळीराम सोनवणे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुणे शहर अध्यक्ष किशोर पंडागळे, प्रदेश सचिव सुभाष सहजराव, पुरंदर तालुका श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष कालिदास उबाळे, श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश संघटक सचिव, निलेश आप्पा आगळे, पुणे शहर कार्याध्यक्ष विशाल ओव्हाळ, पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवक अध्यक्ष स्वप्निल पाटोळे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार, अशोक अवघडे, खडकवासला अध्यक्ष रवि तांबारे, तालुका उपाध्यक्ष सचिन कांबळे, शामराव जगताप, निर्मला परदेशी, रमेश रणदिवे, जेजुरी शहर श्रमिक ब्रिगेडचे शहर अध्यक्ष रंजित भालेराव, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष खोमणे, निखिल गंगावणे, असिफभाई शेख, अनिल साळवे, शुभम यादव, बालाजी सातभाई, राजू जाधव, सुनिल जगताप, वर्षा पिसाळ, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या महिला अध्यक्ष रोहिणी कुंभारकर, सुनिता यादव, केतकावळे उपाध्यक्ष, दिनेश सोनवणे, पंढरीनाथ सोनवणे गौरव माळवे, दत्तात्रय मोरे, कांता सावंत, वसंत चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. हे आंदोलन बेमुदत असून उद्या गायन आंदोलन करण्यात येणार असून ठोस कारवाई केल्याशिवाय आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही, असे रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी सांगितले.







