Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rohit Pawar : MCA निवडणुकीत रोहित पवारांचा ‘मास्टरप्लॅन’? केदार जाधवांचा खळबळजनक आरोप; १८ नातेवाईक अन् ३७ नेत्यांची मतदार यादीत घुसखोरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 January 2026, 11:49
Rohit Pawar

photo- social media

Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या निवडणुकीवरून सध्या चांगलाच वाद पेटलाय. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असताना माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या भाजपचे पदाधिकारी असलेले केदार जाधव यांनी गंभीर आरोप केलेत. (Rohit Pawar)

 

जाधव म्हणतात की 25 डिसेंबरला जाहीर झालेल्या मतदार यादीत अचानक तब्बल 401 नवीन आजीव सभासदांची भर घालण्यात आली. आधी जिथे जनरल बॉडी फक्त 150 सदस्यांची होती, ती थेट 600 च्या पुढे गेली आहे. हे सगळं संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जाधव यांच्या म्हणण्यानुसार, या नव्या सदस्यांमध्ये 25 जण हे मागील कौन्सिल सदस्यांचे नातेवाईक आहेत, तर तब्बल 18 जण रोहित पवार यांचेच नातेवाईक असल्याचा दावा आहे. याशिवाय 56 सदस्य हे रोहित पवार यांच्या व्यवसायाशी किंवा वैयक्तिक ओळखीचे असल्याचंही ते सांगतात. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे 37 नेतेही या यादीत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

केदार जाधव एप्रिलमध्ये भाजपमध्ये सामील झाले असून त्यांनी ‘कॅटेगरी A’ मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. ते म्हणतात की लोढा समितीच्या शिफारशींचा सरळसरळ भंग होत असून, क्रिकेट प्रशासनावर काही ठराविक घराण्यांची पकड निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. नवीन सभासद घेताना ना असोसिएशनच्या घटनेत बदल करण्यात आला, ना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेण्यात आली, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला आहे.

या सगळ्या प्रकरणात केदार जाधव आणि लातूर क्रिकेट असोसिएशनचे कमलेश ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, रोहित पवार यांचे समर्थक आणि MCA मधील सध्याचे पदाधिकारी हे सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. त्यांचा दावा आहे की नवीन सदस्यांची निवड पूर्णपणे नियमांनुसार झाली असून, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समितीने ही प्रक्रिया पार पाडली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून काही लोक उगाचच राजकारण करत असल्याचंही माजी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

या मतदार यादीत रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे अशी ओळखीची नावं असल्यामुळे पुण्यात मुख्यालय असलेल्या MCA ची ही निवडणूक आता चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
mangeshkar hospital should take care of new born babies of bhise family says MLA Amit Gorakhe

Pune News: मंगेशकर हॉस्पिटलमध्ये माणुसकी हरली? गर्भवती महिलेच्या मृत्यूस रुग्णालयच जबाबदार; पुण्यात चॅरिटी कमिशनचा मोठा दणका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.