पुणे: पुणे शहर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडल्याने आनंदाची बातमी आहे. पुण्यातील प्रमुख धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झालेला आहे. यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. यावर्षी मे महिन्यातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली होती.

पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले खडकवासलाची एकूण साठवण क्षमता ८६ दशलक्ष घनमीटर असून सध्या ते 59.60 टक्के भरले आहे. सध्या त्यात ६३.३२ दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाले आहे. याशिवाय, मुळशी तालुक्यातील टेमघर धरण 67.44 टक्के भरले आहे. पानशेत 71.87 टक्के भरले आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मुळशी नदीवर बांधलेले वरसगाव हे एक असून धरण 77.34 टक्के भरले आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता २९३.०६ दशलक्ष घनमीटर आहे.









