पुणे: पावसाळ्याचे दिवस असले तरी पुणेकरांना आता पाण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित एका महत्त्वाच्या दुरुस्ती कामासाठी गुरुवारी (१७ जुलै) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गळती रोखण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान, पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य वाहिनीचे दुरुस्ती काम करण्यात येणार आहे. जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व टाक्या व केंद्रांचा पाणीपुरवठा पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य वाहिनीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आल्यामुळे बंद ठेवल जाणार आहे.
गुरुवारी शहराच्या अनेक प्रमुख भागांत पाणीपुरवठा होणार नाही. यात खालील परिसरांचा समावेश आहे:

पुणे शहरातील सर्व जुन्या पेठा, पर्वती दर्शन परिसर आणि मुकुंदनगर, दत्तवाडी, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर,औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, चिखलवाडी, खडकी, आंबेडकर वसाहत, अभिमानाश्री सोसायटी आणि स्वारगेट परिसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेक टाऊन, अप्पर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, सॅलेसबरी पार्क, ठाकरे वसाहत, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कोंढवा खुर्द आणि साईबाबानगर येथे गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.

पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, महात्मा सोसायटी, एकलव्य कॉलेज, काकडे सिटी, सिप्ला फाउंडेशन, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, सहजानंद, गांधी स्मारक, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण आणि कॅनॉल रोड या भागातही गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.
चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सागर कॉलनी, पूजा पार्क, भूगाव रोड, कोकाटे वस्ती, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी व डावी भुसारी कॉलनी, डुक्कर खिंड, शास्त्रीनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा आणि सुस रोड परिसर या भागातही गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.
मेडी पॉईंट रोड, बाणेर, बालेवाडी, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, विधाते वस्ती, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, शाहू कॉलनी, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, शिवणे इंडस्ट्रीज आणि कोंढवे धावडे या ठिकाणीही दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.
पूर्ण शिवाजीनगर परिसर, संपूर्ण कोथरूड, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, जयभवानीनगर, केळेवाडी, पोलिस लाईन, लॉ कॉलेज रोड, करिष्मा सोसायटी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, भांडारकर रोड, प्रभात रोड, डी.पी. रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, नवसह्याद्री आणि ताथवडे उद्यान याभागातही पाणीपुरवठा होणार नाही.
गणराज चौक, समर्थ कॉलनीचा भाग, जुने वारजे जलकेंद्र भाग – रामनगर, अहिरेगाव, गणपती माथा परिसर माळवाडी, गोकुळनगर पठार, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर आणि संपूर्ण खडकी आणि हरिगंगा सोसायटी, वारजे हायवे परिसर, एनडीए रोड तसेच मुळा रोड, रामनगर, उत्तमनगर, शिवणे आणि न्यू कोपरे या ठिकाणीही दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.
दुरुस्तीचं काम सुरु असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.







