Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्यातील राहू अन् नानगाव येथील बिबट्या जेरबंद….

संदीप टूलेby संदीप टूले
Monday, 16 December 2024, 15:23

पुणे : दौंड तालुक्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यातील राहू परिसरातील बिबट्या मादी आणि नानगाव येथील ढगेवस्ती परिसरातील बिबट्या जेरबंद झाला आहे.

त्यात राहू परिसरात गेल्या महिन्याभरापासून मुक्तपणे संचार करून जनावरांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करून धुमाकूळ घालणारी बिबट्या मादी आज सोमवारी पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकली आहे. तर काही दिवसापूर्वी याच परिसरात बिबट्याची तीन लहान पिल्ले मिळून आली होती. यामुळे या भागात बिबट्या असण्याची शक्यता होती. या बिबट्याच्या दहशतीमुळे या भागात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तर दुसरा बिबट्या दौंड तालुक्यातील नानगाव येथील ढगेवस्ती परिसरात लोकवस्तीच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करीत होता. त्यामुळे त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावला होता. शनिवारी (दि.14) रात्री एक बिबट्या जेरबंद झाला आहे.‌ दरम्यान, दौंड तालुक्यातील बहुतांशी गावात बिबट्याचा वावर असून लोक दहशतीखाली आहेत.

पुणे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अंकुश खरात, वनरक्षक शीतल मेरगळ, वनकर्मचारी अरुण मदने आदींनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी. बिबट्या आढळल्यास त्वरित दौंड वन विभागाची संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी राहुल काळे यांनी केले आहे.

 

दौंड तालुक्यातील नानगाव येथे एका बिबट्याला जेरबंद करण्यात दौंड वनविभागाला यश आले. तरी कानगाव, कडेठाण, हातवळण या भागात आठ दिवस उलटूनही बिबट्या जेरबंद झाला नाही.

दौंड तालुक्यातील कडेठाण, हातवळण आणि कानगाव या भागात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या भागातील शेतकरी नागरिक आणि महिला त्या बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत. शेतामध्ये काम करण्यास त्या घाबरत आहेत. मागील काही दिवसापूर्वी कडेठाण येथे उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. बिबट्याच्या हल्लात या महिलेचा मृत्य झाल्याचा दावा या भागातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केला होता.‌

या घटनेनंतर दौंड वनविभागाने कडेठाण, हातवळण, कानगाव या भागात तब्बल आठ ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र पिंजरा लावलेल्या ठिकाणी बिबट्या गुंगारा देत असल्याचे चित्र आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस ऊसतोड सुरू आहे. परिणामी बिबट्याचे निवारा आणि सुरक्षित ठिकाण असलेल्या उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्या हा स्थलांतरित होत असून शिकारीसाठी नरभक्षक बनत चालल्याचे चित्र आहे.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post
Pune Railway lack of security force to take 41 jawans from maharashtra

रेल्वे सुरक्षा दलाकडे मनुष्यबळाची कमतरता; महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ४१ कर्मचारी घेतले जाणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp