पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका (Pune Zilla Parishad Election) पर्वाचा बारामतीच्या मातीत अत्यंत करुण अंत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी २८ जानेवारी रोजी विमान (Ajit Pawar Death) अपघातात निधन झाले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर काल त्यांच्यावर शासकीय इतमामात (Pune Election) अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण राज्य प्रशासकीय आणि राजकीयदृष्ट्या पोरकं झालं आहे. (Latest Marathi News)

अजित पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला निघाले होते. त्यांचे लिअरजेट ४५ हे विमान लँडिंगच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असताना कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा स्फोट झाला आणि त्यात अजितदादांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. डीजीसीए आणि एएआयबी या संस्था सध्या या अपघाताच्या तांत्रिक कारणांचा सखोल तपास करत आहेत.
या निधनाचे परिणाम आता राजकारणावर उमटू लागले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा मुख्य आधारवड कोसळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) प्रचाराबाबत अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व सभा, रोड शो आणि मिरवणुका रद्द केल्या आहेत. उमेदवार केवळ घरोघरी जाऊन पत्रके वाटतील. विजयानंतरही गुलालाची उधळण टाळून शांततेत विजय साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
आता सर्वांचे लक्ष या पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाकडे लागले आहे. पक्षात विखुरलेली अवस्था निर्माण होऊ नये म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्याची मागणी जोर धरत आहे. त्यांना उपमुख्यमंत्री करून अजितदादांचा वारसा पुढे न्यावा, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले जाणार आहे. अजित पवारांची प्रशासनावर असलेली पकड आणि कामाचा झपाटा पाहता, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हे महायुतीसमोर मोठे आव्हान असेल.







