Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune news : कमी पटसंख्येच्या शाळांचे रुपांतर आता ‘समूह शाळेत’ होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 24 September 2023, 14:39

Pune news : पुणे : शिक्षणाचा अधिकार वाडी-वस्तीवरील मुलापर्यंत पोहोचला पाहिजे, तसेच प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात शेवटपर्यंत टिकले पाहिजे यासाठी भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन सरकारने अतिदुर्गम भागातील वाड्या, वस्त्यांमध्येही शाळा काढल्या. मात्र, आजही शिक्षणाची ही गंगा तळागाळातील घटकापर्यंत झिरपलेली नाही, हे वास्तव आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा आजही पटसंख्येअभावी बंद पडताना दिसत आहेत. काही शाळा एक किंवा दोन विद्यार्थ्यांसाठी देखील भरत आहेत. यावर उपाय म्हणून सरकारने ‘समूह शाळा’ योजनेचा निर्णय घेतला आहे. कमी पटसंख्येच्या शाळांचे रुपांतर आता समूह शाळेत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ‘गाव तिथे शाळा’ ही संकल्पनाच बारगळेल, असे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत.

पानशेत येथील प्रयोग यशस्वी

शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेशा शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणून नंदूरबार येथील तोरणमाळ आणि पुणे जिल्ह्यातील पानशेत या दोन्ही ठिकाणी समूह शाळांचा उपक्रम राबविण्यात आला. त्याप्रमाणे इतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील छोट्या शाळा, (Pune news) विशेषत: कमी पटाच्या शाळा जोडण्याची प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश देण्यात आला. त्यानुसार कार्यवाहीची सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

वास्तविक पाहता शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. प्रत्येक मुलाला त्याच्या गावात तशी सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने सरकारने ‘गाव तिथे शाळा’ संकल्पना राबवली. प्रत्येक गावात शाळा उभारण्यात आल्या. यानंतरही प्रत्यक्षात हजारो विद्यार्थी शालाबाह्य असल्याचे आढळते. (Pune news) अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना अपेक्षित असताना शिक्षण विभागाने आता समूह शाळा योजनेचा निर्णय घेतला आहे.

गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि त्यात शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा, या उद्देशाने समूह शाळेचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद करणे किंवा शिक्षकांची पदे कमी करणे हा समूह शाळेचा उद्देश नाही. (Pune news) तर कमी पटाच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा, खिलाडूवृत्ती, सांघिक भावना वृद्धिंगत होण्यासाठी समूह शाळा विकसित करणे हा मूळ हेतू आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : वाबळेवाडी शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक वारे गुरूजी अखेर दोषमुक्त! चौकशी समितीचा अहवाल

Pune News : सर्व कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक ; तब्बल 1744 कंपन्यांना आरटीओकडून नोटीसा

Pune News : माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा; राहुलकुमार अवचट यांची मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25
Next Post

Breaking News : भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी व मुलावर गुन्हा दाखल; संगनमताने घातला १०० जणांना २५ कोटींचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp