प्रतिनिधी,अमित मुंडीक

Pune News : मुठा नदी संरक्षणासाठी “नदी महोत्सव 2025 – स्वच्छ नदी, सुंदर पुणे” हा भव्य उपक्रम भिडे पुलापासून म्हात्रे पूलपर्यंत उत्साहात पार पडला. पुणे महानगरपालिका, युवा फॉर अँक्शन, इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (pune news)
या उपक्रमास मा. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,Joint Commissioner of Police रंजन कुमार शर्मा, पुणे ग्रामीण एसपी संदीप सिंह गिल आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थी, युवक, नागरिक, कॉर्पोरेट्स तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
स्वच्छता मोहिमेसोबत पथनाट्यांचे आयोजन करून नदी स्वच्छतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहिम नसून संपूर्ण शहराचा पर्यावरणीय उत्सव ठरला असून, हजारो स्वयंसेवकांनी एकत्र येऊन “स्वच्छ आणि हरित पुणे” घडविण्याचा संकल्प दृढ केला.







