Wednesday, May 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : भीमाशंकरमध्ये पुजाऱ्याला बेदम मारहाण; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शनावरून वाद घालतं केला राडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 January 2026, 15:54
Pune News

photo- social media

Pune News : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांनी मंदिरातील एका पुजाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र मारहाण झालेल्या पुजाऱ्याने अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल केलेली नाही.

भीमाशंकर मंदिरात नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. मुख्य गाभारा लहान असल्यामुळे अभिषेक सुरू असताना दर्शनासाठी जागा फारच कमी उरते. त्यामुळे तासन्‌तास रांगेत उभे राहिलेले भाविक गर्दीत धक्के खात दर्शन घेतात. अभिषेकाच्या वेळेत अशा तणावाच्या परिस्थिती अनेकदा पाहायला मिळतात.

 

घटनेच्या दिवशीही मंदिरात अभिषेक सुरू होता आणि आरती चालू होती. याच वेळी देविदास दरेकर हे आपल्या सहकाऱ्यांसह दर्शनासाठी गाभाऱ्यात गेले. त्यांनी अभिषेक करणाऱ्या भाविकांच्या मागे उभं राहणं केलं. गाभाऱ्यात प्रचंड गर्दी होत असल्याने, त्या वेळचे पुजारी योगेश शिर्के यांनी दरेकर यांना दर्शन घेऊन बाहेर जाण्याची विनंती केली.

मात्र दरेकर यांनीही शिवलिंगाची पूजा करून पाणी घालायची इच्छा व्यक्त केली. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये आधी वाद झाला आणि त्याचे रूपांतर बाचाबाचीत झाले. आरोप आहे की गाभाऱ्यातच दरेकर यांनी पुजाऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर मंदिराबाहेर आल्यानंतर पुजारी योगेश शिर्के यांना मारहाण करण्यात आली. इतर पुजाऱ्यांनी मध्ये पडत वाद शांत केला.

या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला असूनही, संबंधित पुजाऱ्याने अद्याप पोलिसांत तक्रार दिलेली नाही. दुसरीकडे, मारहाण प्रकरणावर देविदास दरेकर यांनी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. भीमाशंकर मंदिरातील काही पुजाऱ्यांची आरेरावी आणि दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला कथित भ्रष्टाचार आपण जनतेसमोर आणणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

वारंवार भूक लागतेय? आहारात करा 'हे' ५ बदल, आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.