Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदवणे घाटात 50 हजार चौरस फुटांवर जलसंधारण अन् 250 झाडांची लागवड; मायभू सेवा यात्रेत ‘शिवम प्रतिष्ठान’ व ‘ड्रीम्स युवा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम!

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 10 August 2026, 10:44

उरुळी कांचन, (पुणे) : पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश केवळ भाषणांतून किंवा शब्दांतून न देता थेट प्रत्यक्ष कृतीतून देत शिंदवणे घाट परिसरात महाराष्ट्रभरातील ग्रामदूतांनी अनोख्या पद्धतीने ‘पर्यावरण संवर्धनाचा महोत्सव’ साजरा केला. मायभू सेवा यात्रा २०२६ अंतर्गत आयोजित तीन दिवसीय उपक्रमात राज्यभरातून आलेल्या 240 हून अधिक ग्रामदूतांनी कडक श्रमदान करत ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर जलसंधारणाचे काम पूर्ण केले, तसेच 250 देशी व फळझाडांची लागवड करून हरित क्रांतीचा नवा आदर्श निर्माण केला.

शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान कराड) आणि ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. 07) ते रविवारी (ता. 09) ऑगस्ट दरम्यान या भव्य सेवा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या सेवा यात्रेदरम्यान शिंदवणे घाट परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये ग्रामदूतांनी अहोरात्र श्रमदान केले. सुमारे 50 हजार चौरस फूट क्षेत्रावर जलसंधारणासाठी सलग समतल चर खोदण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, जमिनीची धूप थांबवून मृदासंवर्धन करणे आणि परिसरातील भूजल पातळी वाढवणे, हा या कामामागील मुख्य उद्देश आहे.

जलसंधारणाच्या या महाकार्यासोबतच परिसरात 250 देशी व फळझाडांची लागवड करण्यात आली. क्रांती दिन आणि लोकनायक बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून ही वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. देशी वृक्षांचे संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

 

या तीन दिवसीय उपक्रमात शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक तथा माजी सनदी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख (काकाजी) यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या विचारधारेमुळे ग्रामदूतांमध्ये सेवाभावाची आणि पर्यावरणाविषयीची एक नवी ऊर्जा निर्माण झाली. सेवा यात्रेच्या समारोप प्रसंगी पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला यामध्ये अनंत तायडे (वनश्री पुरस्कार प्राप्त; संचालक, फोर्टीन ट्रीज फाऊंडेशन, खेड), सागर शेलार (जिल्हा परिषद सदस्य, राहू-खामगाव गट) या दोघांना त्यांच्या पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल ‘मायभू सेवा पुरस्कार 2026’ प्रदान करून गौरवण्यात आले.

दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबावडे सर यांनी केले, तर ऋषीकेश भालेराव यांनी प्रास्ताविकातून सेवा यात्रेची उद्दिष्टे विशद केली. शैलेश गायकवाड व प्रमोद जाधव यांनी ग्रामदूतांच्या कार्याचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले. शेवटी मनोज महाडीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनला जाण्याचे सांगून घराबाहेर पडला अन् गायब; डाळिंब येथील 35 वर्षीय तरुण बेपत्ता

Wednesday, 7 October 2026, 13:43

5 कोटींच्या दाव्याने खळबळ! प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील भेटीवर विराट कोहलीने अखेर मौन सोडलं….

Wednesday, 7 October 2026, 13:33

मैदानावर खेळण्यात दंग होते अन् चोरट्यांनी डाव साधला! डिक्कीतून 80 हजारांचे दागिने लंपास; एफ. सी. रोडवरील घटना

Wednesday, 7 October 2026, 13:06

इलेक्ट्रिक ग्राइंडरने स्वतःचे गुप्तांग चिरले अन् 7 गंभीर जखमा! प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचा थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट

Wednesday, 7 October 2026, 12:53

फडणवीस सरकारला हायकोर्टाचा दणका! पुण्यातील MPSC आंदोलनावर कोर्टाचे खडे बोल; नेमकं काय घडलं?

Wednesday, 7 October 2026, 12:52

‘पोरीच्या अंगात भूत आहे…’ म्हणत भोंदूबाबाने कुटुंबाला फसवले; शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेऊन 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Wednesday, 7 October 2026, 12:39
Next Post

दुधात चक्क शाम्पू आणि केमिकल्स! महाराष्ट्रातील भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; पुण्यातून आणखी 10 आरोपींना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp