Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलिसांचा ‘बुलेट राजांना’ दणका; 13 गाड्यांवर कारवाई; 29 सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 24 September 2026, 13:39

उरुळी कांचन (पुणे): दिवसा, रात्री-अपरात्री मॉडिफाईड बुलेटद्वारे कर्णकर्कश आवाज, सायलेन्सरमधून फटाके, बेदरकार रॅली आणि धिंगाणा घालणाऱ्यांना 29 मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर उरुळी कांचन पोलिसांनी रोडरोलर फिरवला आहे. केवळ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरच नव्हे, तर अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार (बदल) करणाऱ्या गॅरेजचालकांवरही थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल 13 बुलेटवर कारवाई करत 1 लाख 6 हजार 500 रुपयांचा दंड ठोकण्यात आला आहे, तर जप्त केलेल्या 29 मॉडीफाय सायलेन्सरवर थेट रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले आहेत.

उरुळी कांचन व परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही हुल्लडबाज बुलेटस्वार सायलेन्सर मॉडीफाय करून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढत सुसाट गाड्या चालवत होते. तसेच बेकायदेशीरपणे कर्कश हॉर्न वाजवणे आणि नंबर प्लेट नसताना गाड्या चालवण्याचे प्रकार वाढले होते. या धुमाकूळ घालणाऱ्या चालकांमुळे वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले आणि सामान्य नागरिक पुरते हैराण झाले होते. या संदर्भात नागरिकांनी उरुळी कांचन पोलिसांकडे सातत्याने तक्रारी नोंदवल्या होत्या.

या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 बुलेट सायकलींवर माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) पुणे यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या बुलेट चालकांकडून 1 लाख 6 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, यापूर्वी जप्त करण्यात आलेले 29 मॉडीफाय सायलेन्सर रस्त्यावर ठेवून त्यावर थेट रोलरच्या साहाय्याने चेपून ते कायमचे नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे नियम मोडणाऱ्या चालकांचे धाबे दणाणले आहेत.

 

सदरची धडक कारवाई उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे सहायक फौजदार रमेश भोसले, पोलीस अंमलदार चव्हाण, अमोल खांडेकर, अश्वजीत मोहोड आणि पोलीस अंमलदार भोसले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

“नियम मोडल्यास गाड्या जप्त करणार”

“उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायलेन्सर मॉडीफाय करून आवाज काढणे, कर्कश हॉर्न वाजवणे किंवा विना नंबर प्लेट गाड्या चालवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर आणि दंडात्मक कारवाई चालूच राहील,” असा इशारा उरुळी कांचन पोलिसांकडून देण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03
Next Post

जातीवाचक शिवीगाळ अन् पुण्यात ८ अल्पवयीन मुलांना पोलीस चौकीत बेल्टने मारहाण? पुण्यात 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp