पुणे: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Baramati Election) माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने (Rahuru Election) कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे बारामतीत मतदान होणार हे (Sunetra Pawar) जवळपास निश्चित झाले आहे. (Maharashtra Politics)

आज बारामतीत 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. यापूर्वी एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 6 जणांनी माघार घेतल्याने सध्या 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. अंतिम आकडेवारी उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी काही उमेदवार माघार घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामतीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातही हालचाली सुरू आहेत. येथे आज 4 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे राहुरीत आता 18 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या येथेही अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
राहुरीत महायुतीचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. तसेच काही अपक्ष उमेदवार आणि इतर पक्षांचे उमेदवार काय निर्णय घेतात, याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसची भूमिका चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे.







