Tuesday, November 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेरी मेट्रोचा श्रीगणेशा! उद्यापासून धावणार मेट्रो; आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 November 2026, 9:09

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. उद्घाटनानंतर 4 नोव्हेंबर 2026 पासून सकाळी 6 वाजता या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होईल. ‘पुणेरी मेट्रो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पिंक लाईनमुळे हिंजवडी, वाकड, बाणेर, औंध आणि शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार हे देखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर असा सुमारे 23.3 किलोमीटरचा हा मेट्रो मार्ग उभारण्यात आला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, त्यासाठी सुमारे 8,313 कोटी रुपये खर्च झाले आहेत. टाटा आणि सीमेन्स यांच्या सहभागातून स्थापन झालेल्या कंपनीने या मार्गाचे काम केले आहे. या मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत. मात्र, सुरुवातीला 17 स्थानकांवरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

पुणेरी मेट्रोचे तिकीट दर प्रवासाच्या अंतरानुसार निश्चित करण्यात आले आहेत. 0 ते 2 किमी प्रवासासाठी 12 रुपये, 2 ते 4 किमी अंतरासाठी 25 रुपये, 4 ते 8 किमीसाठी 37 रुपये, 8 ते 12 किमीसाठी 43 रुपये, 12 ते 18 किमीसाठी 49 रुपये, तर 18 किमीपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी 62 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे.

4 नोव्हेंबरपासून पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता धावेल. गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी, तर इतर वेळेत दर 12 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयासाठी शेवटची गाडी रात्री 10.30 वाजता सुटेल. तर जिल्हा न्यायालयावरून माणकडे जाणारी शेवटची मेट्रो रात्री 11.40 वाजता असेल. जिल्हा न्यायालय स्थानकावरून महामेट्रोच्या दोन्ही मार्गिकांना जोडणी मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांना संयुक्त मोबाइल ॲप आणि एनसीएमसी कार्डची सुविधाही उपलब्ध होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांचा डल्ला! ना OTP, ना परवानगी… तरीही खात्यातून पैसे गायब

Tuesday, 3 November 2026, 9:25

लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात! पण ऑक्टोबरच्या हप्त्याचं काय? वाचा

Tuesday, 3 November 2026, 9:18

पुणेरी मेट्रोचा श्रीगणेशा! उद्यापासून धावणार मेट्रो; आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Tuesday, 3 November 2026, 9:09

भिडे पुलाजवळ 17 वर्षीय तरुणाला गाठलं अन् कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 3 November 2026, 8:45

पुन्हा युद्ध भडकणार? ट्रम्प यांचा एकीकडे कराराचा दावा, दुसरीकडे इराणवर हल्ला! नेमकं चाललंय तरी काय?

Tuesday, 3 November 2026, 7:52

नोव्हेंबरमध्ये पावसाचा मुक्काम? महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, जाणून घ्या कसे असणार हवामान

Tuesday, 3 November 2026, 7:37
Next Post

लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात! पण ऑक्टोबरच्या हप्त्याचं काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp