Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर पोलिसांची कारवाई; तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या, दोन गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे जप्त….

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 15 March 2026, 23:10

शिरूर: अवैध गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपींविरुद्ध शिरूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच एक फोर्ड फिगो कार आणि एक पल्सर मोटारसायकल असा एकूण सुमारे ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पोलिस हवालदार विशाल कोथळकर यांना माहिती मिळाली की, निमोणे (ता. शिरूर) येथील नागेश्वर विद्यालयासमोर पांढऱ्या रंगाच्या फोर्ड फिगो कारमध्ये काही इसम गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगून थांबले आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, हवालदार विशाल कोथळकर व पोलिस कर्मचारी सुशील सुरवसे यांनी तातडीने घटनास्थळी सापळा रचला.

पोलिसांनी संशयित कारची तपासणी केली असता, त्यामध्ये बसलेले समीर प्रकाश शेलार (वय २३) व संपत गणपत दुर्गे (वय ३५, दोघेही रा. निमोणे, ता. शिरूर) यांना ताब्यात घेण्यात आले.कारमध्ये तपासणी केली असता हँडब्रेकखाली एक गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याच्या मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार (ता. १६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १४) सायंकाळी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार नवनाथ साहेबराव गोरडे (वय ३८, रा. पोहेगाव खुर्द, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) हा दुचाकीवरून अवैध पिस्तुल घेऊन शिरूरकडे येत आहे. त्यानुसार पोलिसांनी अहिल्यानगर–पुणे महामार्गावर सापळा लावला. दरम्यान भरधाव वेगात येणारी मोटारसायकल खासगी वाहनाला धडकून पडल्याने मागे बसलेला इसम पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

तपासणी केली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल व मॅगझिनमध्ये पाच जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीत ही पिस्तुल त्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या सागर बनसोडे (रा. राहता, अहिल्यानगर) यांच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले. या कारवाईत शिरूर पोलिसांनी दोन गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक फोर्ड फिगो कार व एक पल्सर मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, शुभम चव्हाण, हवालदार विशाल कोथळकर तसेच पोलिस कर्मचारी नितेश थोरात, अक्षय कळमकर, सचिन भोई, सुशील सुरवसे, अजय पाटील, दादाराव नागरे, संदीप खेडकर, सागर बोराडे, विजय शिंदे, निखिल रावडे, रविंद्र काळे, निरज पिसाळ आदींच्या पथकाने केली.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Daily Horoscope: हर हर महादेव! आजचा सोमवार तुमच्यासाठी सुख-समृद्धीचा ठरेल का? पहा सविस्तर भविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp