Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 1 September 2026, 9:25

शिरूर: भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण(SIR)कार्यक्रमांतर्गत १९८-शिरूर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली.पुनरिक्षणापूर्वी मतदारसंघात ४ लाख ८१ हजार ९९० मतदार होते.प्रारूप यादीत ही संख्या ३ लाख ७२ हजार १४५ झाली असून, तब्बल १ लाख ९ हजार ८४५ मतदारांची घट झाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पुनरिक्षणात ६६ हजार ९७ मतदार आढळून आले नाहीत.तर, १८ हजार ८०६ मतदार स्थलांतरित झाले असून,१५ हजार ६२५ मतदार मृत असून,८ हजार ६८९ मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळले आहे.त्याचप्रमाणे अन्य कारणांमुळे आणखी ६२८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

सन-२००२च्या मतदारयादीत नाव असलेल्या,मात्र प्रारूप यादीतून वगळलेल्या मतदारांना आवश्यक पुरावे सादर करून नाव पुन्हा समाविष्ट करून घेता येणार आहे.तसेच नाव,पत्ता किंवा अन्य तपशीलांमध्ये दुरुस्ती असल्यास दावा-हरकत नोंदविता येणार आहे.३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे-हरकती स्वीकारले जाणार असून,४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.प्रारूप मतदारयादी मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली.

सन-२००८च्या परिसीमनामुळे बदलली शिरूरची रचना

२००८च्या परिसीमनात लोकसंख्या,भौगोलिक सलगता आणि प्रशासकीय सीमांचा विचार करून पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली.त्यावेळी शिरूर तालुक्यातील काही भाग १९६-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात,तर उर्वरित भाग १९८-शिरूर विधानसभा मतदारसंघात ठेवण्यात आला.शिरूर मतदारसंघात हवेली तालुक्यातील वाघोली,उरुळी कांचन आणि लोणी काळभोर या प्रमुख गावांसह त्यांच्या परिसरातील गावांचा समावेश झाला.
परिसीमन म्हणजे लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या सीमा आणि रचनेची नव्याने आखणी.लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व संतुलित ठेवणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

 

जुना १९८-शिरूर मतदारसंघ पुन्हा होणार?

लोकसंख्या-आधारित परिसीमन २०२६ नंतरच्या पहिल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार होणे अपेक्षित आहे.त्यामुळे भविष्यात शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या सीमा व रचनेत बदल होण्याची शक्यता आहे.मात्र,जुना १९८-शिरूर मतदारसंघ पुन्हा अस्तित्वात येईल का किंवा कोणती गावे कोणत्या मतदारसंघात जातील,हे परिसीमनाची प्रक्रिया आणि अंतिम आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

‘दहावीचं वर्ष आहे तर काय, सारखं अभ्यास कर म्हणती?’ संतापलेल्या तरुणीने थेट घेतला गळफास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp