Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सात दिवस, चार राज्ये अन् 1600 किलोमीटर! फुरसुंगीच्या सायकलवीरांची जगन्नाथ पुरीला धडक

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 November 2026, 18:32

फुरसुंगी, ता. 19 : जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर फुरसुंगी सायकलिस्ट ग्रुपच्या 11 सदस्यांनी फुरसुंगी (पुणे) ते जगन्नाथ पुरी (ओडिशा) असा तब्बल 1 हजार 600 किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या सात दिवसांत पूर्ण केला. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या चार राज्यांतून प्रवास करत सायकलस्वारांनी जगन्नाथ मंदिरात पोहोचून आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली.

या सायकल मोहिमेचा प्रारंभ गुरुवारी (ता. 12 ) पहाटे साडे तीनवाजता फुरसुंगी येथील ग्रामदैवत श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन करण्यात आला. त्यानंतर सोलापूर, संगारेड्डी, खम्मम, राजमुंद्री, विशाखापट्टणम आणि ब्रह्मपूर असा प्रवास करत बुधवारी (ता. 18) सायकलस्वार जगन्नाथ पुरी येथे पोहोचले. दररोज सरासरी 250 किलोमीटर अंतर पार करत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली.

या प्रवासादरम्यान ओडिशा राज्यात प्रचंड वादळ, समोरून वाहणारे वेगवान वारे आणि पावसाचा सामना करावा लागला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीपुढे हार न मानता सर्व सायकलस्वारांनी जिद्दीने प्रवास सुरू ठेवला. विशेष म्हणजे, या मोहिमेत केवळ साहसी प्रवासालाच महत्त्व न देता पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेशही देण्यात आला. आंध्र प्रदेशातील तुन्नी गावात सायकलस्वारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या मोहिमेत गुणवंत गायकवाड सर, राम लावंड, प्रवीण भोसले सर, जीवन पवार, प्रशांत कामठे, तानाजी अडागळे, राघवराव, प्रशांत लोंढे, गोरखभाऊ कामठे, किरण कामठे आणि संतोष मसुडगे यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, यापूर्वीही या ग्रुपने पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, तिरुपती बालाजी आणि अयोध्या राम मंदिर अशा विविध धार्मिक स्थळांच्या सायकल मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. सात दिवसांत 1 हजार 600 किलोमीटरचा टप्पा पार करणाऱ्या या सायकलवीरांचे फुरसुंगीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

जनधन खातेदारांसाठी मोठी बातमी! खात्यात शिल्लक शून्य असली तरी मिळणार 10 हजार रुपये; मोदी सरकारची खास सुविधा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp