Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आळंदी यात्रेसह विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 28 November 2026, 19:15

पिंपरी-चिंचवड : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आगामी संजीवन समाधी सोहळ्यासह विविध सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी 8 डिसेंबर 2026 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37 (1) आणि (3) नुसार हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार शहरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सभा आयोजित करणे किंवा मिरवणूक काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

या काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, दगड, काचेच्या बाटल्या, काचेचे तुकडे किंवा इतरांना दुखापत होऊ शकेल अशा वस्तू सोबत ठेवता येणार नाहीत. याशिवाय स्फोटक, ज्वलनशील आणि दाहक पदार्थ बाळगण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

धार्मिक किंवा सामाजिक वातावरण बिघडेल, अशा प्रकारचे वर्तन टाळण्याचे निर्देशही पोलिसांनी दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीचे किंवा राजकीय नेत्यांचे चित्र, प्रतिकात्मक पुतळे अथवा प्रतिमा यांचे सार्वजनिक प्रदर्शन किंवा दहन करण्यास मनाई आहे. मोठ्या आवाजात आक्षेपार्ह घोषणा देणे, वाद्य वाजवणे तसेच सभ्यता आणि नैतिकतेला बाधा पोहोचेल अशी भाषणे करणे किंवा हावभाव करण्यावरही बंदी लागू राहणार आहे.

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News: हॉटेल बुक करायला गेले अन् 5 लाख गमावले; कुरिअरचा नंबर शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकालाही लाखोंचा फटका!

Saturday, 28 November 2026, 19:26

आळंदी यात्रेसह विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी

Saturday, 28 November 2026, 19:15

‘धर्म बदल, नाहीतर जीवे मारेन!’ पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Saturday, 28 November 2026, 17:21

आधी सासरच्या चौघांविरोधात तक्रार दाखल केली, 40 मिनिटांतच विवाहितेचा मृत्यू; सोलापुरातील घटना

Saturday, 28 November 2026, 17:14

बुधवार पेठेत FDAची धडक कारवाई; तब्बल 2.88 लाखांची मिठाई नष्ट, 8 दुकानांची तपासणी

Saturday, 28 November 2026, 16:08

पावसाच्या बोगस अंदाजाने शेतकऱ्यांचे नुकसान? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Saturday, 28 November 2026, 15:52
Next Post

Pune News: हॉटेल बुक करायला गेले अन् 5 लाख गमावले; कुरिअरचा नंबर शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकालाही लाखोंचा फटका!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp