Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमसंबंधातून सूड! महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल; लोणी काळभोर पोलिसांकडून आरोपीला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 April 2026, 15:01

लोणी काळभोर, ता. 12 : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वैरातून एका महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची व कुटुंबाची बदनामी केल्याचा घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी हिंगोली येथून शुक्रवारी (ता.10) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुनिल रामप्रसाद मुटकुळे (रा. अकोले, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कदमवाकवस्ती येथील एका 37 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे पती चारचाकी वाहन चालवून कुटुंबाला हातभार लावतात. सन 2017 मध्ये त्या एका हॉटेलमध्ये काम करत असताना. आरोपी सुनिल मुटकुळे याच्याशी त्यांची ओळख झाली होती. ओळख वाढत जाऊन त्याचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.

 

काही काळानंतर आरोपी सुनिल हा गावी निघून गेला, मात्र दोघांमध्ये फोनवरून संपर्क सुरू होता. दरम्यान 2021 मध्ये पतीसोबत वाद झाल्यानंतर पिडीता सुनिलकडे संभाजीनगर येथे गेल्या. त्यानंतर सुमारे चार वर्षे त्या आरोपीसोबत राहिल्या. या काळात आरोपीने फिर्यादींचे परवानगीशिवाय खासगी फोटो व व्हिडिओ चित्रीत केले आहे.

दरम्यान, आरोपीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादी फेब्रुवारी 2026 मध्ये पुन्हा आपल्या पतीकडे परतल्या. यानंतर आरोपीने सूडबुद्धीने सोशल मीडियाचा वापर करत बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरुवात केली. आरोपीने अनेक फेक आयडीद्वारे हे फोटो नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यात आले. या प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाची समाजात मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असून फिर्यादींना मानसिक धक्का बसला आहे.

सुरुवातीला बदनामीच्या भीतीने पिडीता यांनी मौन बाळगले, मात्र प्रकार सुरूच राहिल्याने अखेर त्यांनी धैर्य दाखवत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कलम 74,75,77,356 (2) माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66, 66 (ई),66 (क), 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचे लोकेशन काढून हिंगोली येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत तीन दिवसांची रिमांड ठोठावली आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, अमोल जाधव, सागर कदम, गणेश खरात, सागर धायतोंडे, अशोक गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post
Sunetra Pawar

Pune : सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेची राज्य सरकार घेणार पूर्ण काळजी! जीवाला धोका असल्याच्या पत्राची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.