Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाटसच्या माजी सरपंचाच्या मुलाचा कारनामा; शेवाळवाडी ते थेऊर फाटा दरम्यान समोर येईल त्या गाड्या उडवल्या, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या शिताफीने चालक जेरबंद

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 August 2026, 11:52

लोणी काळभोर, ता. ४ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. ३) सायंकाळी घडलेल्या थरारक प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाटस (ता. दौंड) येथील माजी सरपंचाच्या मुलाने भरधाव वेगाने फॉर्च्युनर वाहन चालवत शेवाळवाडी ते थेऊर फाटा या दरम्यान समोर येईल त्या वाहनांना धडक देत अक्षरशः धुमाकूळ घातला. या बेफाम वाहनचालकाने १० ते १५ हून अधिक वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली असून, लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत थेऊर फाटा येथे वाहतूक कोंडी करून त्याला मोठ्या शिताफीने पकडले.

या प्रकरणात राजवर्धन युगंधर शितोळे (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. ही धाडसी कारवाई लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार आरती खलसे, महिला पोलीस नाहीद शेख, पोलीस हवालदार विवेक जगताप आणि ट्रॅफिक वॉर्डन सागर राऊत यांनी केली.

या बेफाम वाहनचालकाच्या धडकेत तीन जण गंभीर, तर तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लोणी काळभोर येथील गंगा गणेश कुंभार या गंभीर जखमी झाल्या असून, कवडीपाट टोलनाक्याजवळ एका महिला व तिच्या लहान मुलीलाही दुखापत झाली आहे. तसेच इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी परिसरात फॉर्च्युनर (गाडी नं MH 14 GA 6565) वाहनाने एका पोलिसाच्या वाहनालाही धडक दिली. त्यानंतर हे वाहन पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव निघाल्याची माहिती महिला पोलीस हवालदार आरती खलसे व महिला पोलीस नाहीद शेख यांना मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलीस हवालदार विवेक जगताप व ट्रॅफिक वॉर्डन सागर राऊत यांच्या मदतीने थेऊर फाटा येथे वाहतूक नियंत्रित करत वाहनाला अडवण्याची योजना आखली.

दरम्यान, राजवर्धन शितोळे हा मार्गातील १० ते १५ वाहनांना धडक देत पुढे जात होता. मात्र, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी आखलेल्या रणनीतीत तो अडकला. वाहन थांबवल्यानंतरही तो गाडीतून बाहेर येण्यास तयार नव्हता. अखेर महिला पोलीस हवालदार आरती खलसे आणि महिला पोलीस नाहीद शेख यांनी धाडस दाखवत त्याला वाहनाबाहेर काढले आणि लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे आणखी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वेळेत कारवाई झाली नसती, तर हा बेफाम वाहनचालक पाटसपर्यंत अनेक वाहनांना धडक देत आणखी मोठी दुर्घटना घडवू शकला असता.

वाहनचालक राजवर्धन शितोळे याने मद्य किंवा अन्य कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून, याबाबतचा तपास सुरू आहे. तपासानंतरच यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पाटसच्या माजी सरपंचाच्या मुलाच्या बेफिकीर कृत्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रभावशाली कुटुंबातील व्यक्तींनी कायद्याचे पालन करण्याऐवजी अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळणे अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पाटसच्या माजी सरपंचाच्या मुलाचा कारनामा; शेवाळवाडी ते थेऊर फाटा दरम्यान समोर येईल त्या गाड्या उडवल्या, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या शिताफीने चालक जेरबंद

Tuesday, 4 August 2026, 11:52

Ola-Uber ला मोठा धक्का? भाडेवाढीचा त्रास संपणार; पुण्यात आली नवीन टॅक्सी सेवा

Tuesday, 4 August 2026, 11:43

Old Monk, Bagpiper, Royal Challenge सह ‘या’ प्रसिद्ध दारू ब्रँडच्या विक्रीवर बंदी; दारूच्या शौकिनांसाठी मोठी बातमी

Tuesday, 4 August 2026, 9:58

पोलीस ठाण्यातच ‘डील’ ठरली अन् ACB ची टीम पोहोचली! 40 हजार रुपये लाच घेताना PSI आणि पोलीस शिपायाला रंगेहाथ पकडले

Tuesday, 4 August 2026, 9:40

अधिकाऱ्यांनी बनावट कर्मचारी दाखवून लाटला 6.5 कोटींचा पगार; पोलिस दलातील मोठा महाघोटाळा उघडकीस

Tuesday, 4 August 2026, 9:24

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कन्येचे निधन; साहित्यविश्वात शोककळा

Tuesday, 4 August 2026, 8:59
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.