फुरसुंगी, ता. 25: फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिला नगरसेवक व नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळविण्यासाठी अनेक उमेदवारांनी रणशिंग फुंकले आहे. परंतु, या नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. 5 ची लढत सर्वात चुरशीची होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात राहूल बाजीराव कामठे व संगीता गोविंद सुर्यवंशी या दोन उमेदवारांनी इतर उमेदवारांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Fursungi-Uruli Devachi Municipal Council)

भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ, सबका विकास या धोरणाला अनुसरून राहूल आबा कामठे यांनी या प्रभागात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, गटार योजना, स्ट्रीटलाईट, कचरा व्यवस्थापन, महिलांसाठी सुरक्षा विषयक उपाययोजना, युवकांसाठी दिशादर्शक उपक्रम आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेऊन या प्रभागात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. वेळप्रसंगी स्वखर्चाने बहुतांश कामे पूर्ण केली आहेत.
फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या 2 डिसेंबरला मतदान होत असून नागरिकांच्या अपेक्षा, आशा आणि विकासाच्या मागण्या अधिक जोराने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग 5 मधून राहूल आबा कामठे व संगीता नानी यांच्या विकासात्मक कार्यशैलीची सर्वत्र चर्चा असून त्यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास बसला आहे.
राहूल कामठे व संगीता सुर्यवंशी यांच्या प्रचाराला महिलांसह तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या उपस्थितीमुळे प्रचार मोहिमेला वेगळीच रंगत आली आहे. त्यांची काम करण्याची गती, तत्परता आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क यामुळे प्रभागाच्या विकासाची गती मिळणार आहे. महिलांना सुरक्षित वातावरण, मूलभूत सुविधा आणि घरगुती समस्यांवर वेळेवर धावून येणारे नेतृत्व म्हणून त्या दोघांकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, “केवळ भाषण करणारा नव्हे, काम करून दाखवणारा नेता म्हणजे राहूल कामठे होय. अशी जनमाणसात त्यांची प्रतिमा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेमुळे त्यांची विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दुकानदार, कामगार सर्वांच्यातून त्यांना मिळणारा पाठिंबा हीच त्यांच्या लोकप्रियतेची खरी ओळख निर्माण झाली आहे.
2 डिसेंबरला मतदान तर 3 तारखेला फैसला
फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात 2 डिसेंबरला होणार आहे. मतदार राजाचा कौल कोणाच्या बाजूने आहे. याचा फैसला 3 तारखेला होणार आहे. तत्पूर्वी उमेदवारांच्या जोरदार प्रचारामुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“प्रभागाचा सर्वांगीण विकास हा माझा एकमेव ध्यास आहे. फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद क्षेत्रात भाजपच्या विकास विचारधारेतूनच पुढील कामे करणार आहे. प्रभाग 5 मधील प्रत्येक समस्या ही माझी जबाबदारी आहे.” त्यामुळे सर्वांनी आम्हा दोघांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी.
– राहुल कामठे (प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार)







