पुणे: पुणे (Pune News) शहरात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असतानाच, आता एका रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यात तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गुंगीकारक औषधांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा खळबळजनक खुलासा खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केला.

पुण्यात केवळ अंमली पदार्थच नव्हे, तर ‘शेड्युल एच’ गटातील अतिशय घातक आणि गुंगीकारक औषधांची विनापरवाना खरेदी-विक्री होत आहे. विशेष म्हणजे, ही औषधे पुण्याच्या कोणत्याही स्थानिक मेडिकल स्टोअरमधील नसून, त्यांचा पुरवठा थेट परराज्यातून केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या रॅकेटप्रकरणी आतापर्यंत पाच जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) सध्या अशा संशयास्पद विक्रीवर नजर ठेवून आहे.







