पुणे: मॅट्रिमोनिअल (Pune News) संकेतस्थळावर पुणे शहरातील एका तरुणीला जोडीदार शोधणे चांगलेच महागात पडले आहे. रास्ता पेठेत राहणाऱ्या या तरुणीने जीवनसाथी शोधण्यासाठी एका नामांकित विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तिथे तिला एका तरुणाने संपर्क साधला. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीचा विश्वास संपादन केला.

तरुणाने लग्नाचे खोटे आश्वासन दाखवून तरुणीला 6 लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघड झाले आहे. वेळोवेळी विविध कारणे सांगून तरुणीकडे पैशांची मागणी सुरू केली. तरुणीनेही तरुणावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता त्याला 6 लाख रुपये दिले.
पैसे खात्यात जमा झाल्यानंतर तरुणाने तरुणीसोबत बोलणे पूर्णपणे बंद केले आणि त्यानंतर काही दिवसांतच आपला मोबाईल क्रमांकही बंद केला. तरुणीने अखेर समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






